आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील दुकानांची बोली नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ताडीचीझाडेच नसल्याने दुकानांतून विक्री होणारी ताडी ही रासायनिक द्रव्यापासूनची निर्मिती आहे. त्यामुळे ताडी दुकानांचा लिलाव रोखा, दुकानांतून विक्री होणाऱ्या ताडीची तपासणी करा, दोषींवर गुन्हे दाखल करा, ही मागणी घेऊन लोक रस्त्यावर आले होते. मोर्चे काढले.

लोकप्रतिनिधीं पासून पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनवले. ही लोकभावना दडपून शुक्रवारी दुपारी प्रचंड पोलिस बंदोबस्तात शहर आणि जिल्ह्यातील १३ दुकानांचा लिलाव झाला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे या लिलावासाठी नव्हते. राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक सागर धोमकर यांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली.

१५ सप्टेंबर २०१५ रोजी न्यू पाच्छा पेठेतील ताडी दुकानातच एकाचा मृत्यू झाला. जेलरोड पोलिस ठाण्याचे फौजदार कुंदन सोनोने यांनी स्वत: मृतदेह उचलून शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
त्यानंतरमोदी येथील ताडी दुकान समोरच आणखी एकाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर ताडी दुकाने बंद करण्याची मागणी होऊ लागली. जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या. परंतु याच दरम्यान आणखी १५ ताडी दुकानांच्या लिलावाची नोटीस प्रसिद्ध झाली. त्याने जनक्षोभ उसळला. १४ ऑक्टोबरला युवकांचा प्रचंड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम यांनी त्याचे नेतृत्व केले होते. १४ तारखेचा लिलाव रोखण्याचे आवाहन केले. एवढ्या घडामोडी घडल्यानंतर हा लिलाव थांबवला जाईल, असे वाटत होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी लिलाव पूर्ण करण्याचा हट्टच धरला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी पर्यंत जिल्हाधिकारी बहुउद्देशीय सभागृहात ही प्रक्रिया पूर्ण झाली.