आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आज नगरसेवकांना दाखवणार, सोलापूरमध्‍ये खिलाडी ग्रुपचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्वच्छ भारत अभियानावर आधारित टाॅयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट सामाजिक प्रबोधन करणारा आहे, हा चित्रपट शहरातील नगरसेवकांनी पाहिल्यास नक्कीच लाभ होईल. यासाठी खिलाडी ग्रुपच्या वतीने हा चित्रपट शहरातील नगरसेवकांना मोफत दाखवण्याचा मानस केला आहे. शुक्रवारी (दि.११) दुपारी. १२ वा. प्रभात टॉकीज येथे हा चित्रपट पाहिला जाणार असून नगरसेवकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सुरेश जगलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला अनुसरून अभिनेता अक्षयकुमार यांचा टाॅयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटापासून सर्वांनी प्रेरणा घेऊन स्वच्छ भारत आभियानाला हातभार लावावा. या दृष्टीने शहरातील निवडक नगरसेवकांना ग्रुपच्या चित्रपट वतीने दाखविण्यात येणार आहे. विविध टाॅकीजमध्ये अक्षयकुमार यांच्या चित्रपटाचे स्वागत वेगवेगळ्या प्रकारे ग्रुपतर्फे केले जाते. 
 
खिलाडी ग्रुपचा मानस 
शुक्रवारी प्रदर्शित होणारा टायलेट एक प्रेमकथा हा एक सामाजिक जाणीव करून देणारा असल्यामुळे नगरसेवकांना दाखविण्यात येणार आहे. चित्रपट नगरसेवकांना दाखवावा याबाबत बैठकीत निर्णय झाला होता. मोदी यांनीही चित्रपटाचा प्रीमियर शो पाहून कौतुक केले आहे. शहरातही नागरिक शौचास बाहेर जातात. सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात सार्वजनिक शौचालय बांधावे, जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे असा प्रामाणिक हेतू खिलाडी ग्रुपचा आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...