आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी स्वच्छतागृहे सुरू करण्यात इच्छाशक्तीचा अभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महिलांसाठीबांधलेली स्वच्छतागृहे त्वरित सुरू करण्याचे आदेश महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी दिले. काम करण्याची इच्छा नसेल तर सांगा, मात्र महापालिकेचे पैसे पाण्यात घालू नका, असेही त्यांनी सुनावले.

महापालिकेने शहरात महिलांसाठी तीन ठिकाणी स्वच्छतागृहे बांधली. चालवण्यासाठी बिगरसरकारी संस्थेकडे ते देणे अपेक्षित होते. ते दिले नाही. ३० जुलै २०१५ रोजी याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांना विचारले असता त्यांनी पंधरा दिवसांत स्वच्छतागृहे सुरू करू, अशी हमी दिली होती. प्रत्यक्षात पुढे काहीही झालेले नाही.

दहाठिकाणी स्वच्छतागृहे : कंबरतलाव बाग, रूपाभवानी मंदिर परिसर, बाळे येथील स्वच्छतागृहांचे काम पूर्ण झाले आहे. तर सुशीलनगर, बहुरूपीनगर, एसटी स्टॅन्ड आवार, प्राणिसंग्रहालय, नेहरू नगर शाळेच्या मागे, सलगर वस्ती डोणगाव रोड, मुकुंद नगर येथे बांधण्यात येणार आहेत.

रचनेत केला बदल
एकूण२५ बाय १० स्क्वेअर फूट जागेवर स्वच्छतागृह बांधले जात आहे. तळमजल्यावर आठ स्वच्छतागृहे आणि वरच्या मजल्यावर चार बाथरुम आणि चार स्वच्छतागृहे अशी रचना असलेले कंबर तलाव बागेत आणि रूपाभवानी मंदिर परिसरात बांधण्यात आले. वरील मजल्याचा गैरवापर होत असल्याने पुढील कामासाठी रचना बदलली आहे. वरचा मजला रद्द करून तळमजल्यावर आठऐवजी अकरा स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. यामध्ये शौचालये आणि स्नानगृहे असतील. असे बांधकाम बाळे येथे झाले आहे. एका स्वच्छतागृहासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च होत आहे.

लवकरच निविदा
तिन्हीस्वच्छतागृहांची लवकरच निविदा प्रसिध्द करू. चालवण्यासाठी समर्थ असेल त्या संस्थांना नियमाप्रमाणे देऊ.” प्रदीपसाठे, उपायुक्तमहापालिका