आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माळरानावर पर्यटकांच्या पाऊलखुणा, ३८ पर्यटनस्थळांची समितीद्वारे माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा हा राज्यात मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रामुळे येथील विकासाला अनेक बाधा असल्या तरी जिल्ह्याला ऐतिहासिक ठेवा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. याच ऐतिहासिक स्थळाचा विकास व्हावा, त्याची प्रसिद्धी होऊन याद्वारे पर्यटकांचे पाऊल जिल्ह्याकडे वळावे यासाठी समविचारी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उस्मानाबाद पर्यटन विकास समिती हा ग्रुप गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे. समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ऐतिहासिक, नैसर्गिक, धार्मिक क्षेत्रांची माहिती समोर आणून पर्यटकांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न होत असून यामुळे माळरानाच्या या डोंगरावर हळुहळू पर्यटकांच्या पाऊलवाटा निर्माण होऊ लागल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख केवळ हवा, पाणी आणि तुळजाभवानी एवढ्यापुरती सीमित नसून येडेश्वरीदेवी, तेरचा ऐतिहासिक ठेवा, संत गोरोबा काका, लामतुरे पुराणवस्तु संग्रहालय, रामलिंगचे मंदिर, उस्मानाबादच्या लेण्या, परंड्यासह नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला, माणकेश्वरचे मंदिर, डोमगावचा कल्याणस्वामींचा मठ अशा विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांनी नटलेले विस्तीर्ण उस्मानाबाद अशी आहे. फक्त लोकप्रतिनिधींच्या अपेक्षित दूरदृष्टीअभावी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा ठेवा राज्य, देश दूरची गोष्ट जिल्हावासीयांच्याही नजरेसमोर येऊ शकला नाही ही शोकांतिका आहे. याचे उदाहरण म्हणजे उस्मानाबादच्या किती नागरिकांना लेण्यांची माहिती आहे याचे उत्तर शोधल्यास मिळून जाते. परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी मनात आस्था बाळगून असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चमू उस्मानाबाद पर्यटन विकास समितीच्या माध्यमातून कार्यतत्पर झाला आहे. या व्यासपीठाच्या माध्यमतातून जिल्ह्यातील विविध पुरातन स्थळ, नैसर्गिक ठिकाण, ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक स्थळांना भेटी देणे, तेथील माहिती, कथा, अख्यायिका, इतिहास जाणून घेऊन तो पुन्हा जिल्हावासीयांसाठी माहितीकरीता जाहिर करणे, अशा ठिकाणी जाऊन स्वच्छता माेहीम राबविणे, तेथील पायाभूत सुविधांसाठी, पर्यटनाच्या दृष्टीने विकासासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अशा प्रकारे समितीचे कार्य सुरू आहे. युवराज नळे यांच्या संकल्पेनेतून पुढे आलेली ही समिती देविदास पाठक, अक्षय ढोबळे, जयराज खोचरे, गणेश सुत्रावे, नाना घाडगे, हर्षद जैन, प्रताप देशमुख, उमाजी गायकवाड, बालाजी इंगळे, समाधान घोलप, अॅड.बोंदर, पुरातन विभागाचे उपसंचालक अजीत खंदारे, तसेच डॉक्टर, विधिज्ञ, पत्रकार, उद्योजक, व्यवसायीक, शिक्षक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी अशा एकविचाराच्या हजारो सदस्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे. यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाच्यादृष्टीने नागरिकांमध्येही हळुहळू प्रयत्नाचे बीज रोवले जाऊ लागले आहे.

लोकप्रतिनिधी,प्रशासनाचे पाठबळ मिळेना
ऐतिहासिक ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, पर्यटकांना या ठिकाणांकडे आकर्षित करण्यासाठी आवश्यक मार्केटिंग व्हावे, विकासकामांसाठी निधीची तरतूद व्हावी साठीही समितीकडून पाठपुरावा होत आहे. वास्तविक पाहता शासनाकडून विविध क्षेत्रात लोकचळवळीची, सहभागाची अपेक्षा ठेवली जाते. याठिकाणी अगोदरच लोकसहभागाद्वारे कार्य सुरू असून त्याला अपेक्षित पाठबळ मिळत नसल्यामुळे कार्याला गती मिळणे अवघड होत आहे.
नळदुर्ग किल्ल्यातील पर्यटकांचे आकर्षण असणारे नर-मादी धबधबा. संग्रहितछायाचित्र

बियांची टोभणी
पर्यावरणाचासमतोल राखण्यासाठी १० लाख बियांचीे टोभणी करण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या पावसामध्ये जवळपास एक लाख बियांचे टोकन करण्यात आले असून उर्वरीत बियाणे टोभणीसाठी जिल्हाभरातील सदस्यांकडे पाठविण्यात आले आहे. पाऊस पडताच उर्वरित बियाणांचे टोभण केले जाणार आहे.

४५०० सदस्य
समितीचाउद्देश, कार्य पाहून मुळचे जिल्ह्यातील परंतु, सध्या उद्योग, नोकरीनिमित्त बाहेरगावी कार्यरत असणारे ४५०० सदस्य जोडले गेले आहेत. व्हाट्सअॅपवर उस्मानाबाद पर्यटन समिती नावाचा ग्रुप, फेसबुकवर पेज आहे. कॅनडातील सदस्याने समितीच्या नावे वेबसाइट सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पर्यटन विकास समितीद्वारे जिल्ह्यातील दुर्लक्षीत धार्मिक, ऐतिहासीक स्थळांना नागरिकांसमोर आणून या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी समितीच्या वतीने आतापर्यंत युवराज नळे इतरांनी जिल्ह्यातील ३८ अशा ठिकाणांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांसमोर आणली आहे. यामध्ये त्या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व, तेथील अख्यायिका, कथा, त्या मंदिर अथवा वास्तुसंदर्भात माहिती दिली जात आहे. यामुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती इतरांपर्यंतही पोहोचून पर्यटनवाढीला चालना मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...