आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या धक्क्यामुळे सराटी, भोत्रा येथे दोघांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा/नळदुर्ग- परंडा तालुक्यातील भोत्रा सराटी (ता. तुळजापूर ) येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सोमवारी (दि. २) दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

सोमवारी सकाळी नऊ वाजता भोत्रा शिवारातील एका डीपीवर जोडणी तोडण्याचे काम वीजसेवक गणेश मुकुंद आलाट (रा. पिंपळवाडी, ता. परंडा) करत होते. त्याच वेळी त्यांना विजेचा झटका बसला. यामुळे खाली पडले. त्यांना उचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विशाल दत्तात्रय कांबळे (रा. कात्राबाद, ता. परंडा) यांनी दिलेल्या माहितीवरून परंडा येथील पोलिस ठाण्यात घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सोमवारीच सकाळी आठ वाजेच्या सुमारास सराटी येथे नितिन लक्ष्मण कट्टकुरे (२५, रा. सराटी) मल्लिकार्जुन कुंभार यांच्या शेतातील विद्युत खांबावर चढून वायर जोडण्याचे काम करत होता. मात्र, त्याच वेळी त्याला विजेचा धक्का बसला. यामुळे तो खांबावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. मात्र, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सचिन कट्टेकुरे यांनी दिलेल्या माहितीवरून नळदुर्ग येथील पोलिस ठाण्यात घटनेेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...