आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी घोणस सापाची ३२ पिले आढळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - तालुक्यातीलढेकरी येथे अत्यंत विषारी आणि दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या घोणस जातीचा साप ३२ पिले आढळून आली आहेत. चार प्रमुख विषारी सापापैकी घोणस हा एक आहे. ढेकरी येथे औदुंबर रोडे यांच्या माळवदाच्या घरात मंगळवारी (दि.७) सकाळी ही पिले आढळून आली.

सर्पमित्रांनीदिले जीवदान
यावेळीछत्रपती सर्पमित्र संघटनेचे विशाल रोचकरी, दत्ता हंगरगेकर, विलास रोडे, राज वाघमारे, नितीन जाधव, सुनील काकडे आदींनी पिलांना फॉरेस्टमध्ये सोडून जीवदान दिले.

- जन्मताच घोणस जातीच्या सापाची पिले विषारी असतात.
- डिवचल्यानंतर तो स्वत:चा आकार क्वाईलसारखा गोलाकार करतो.
- प्रेशरकुकर सारखा मोठा आवाज करून धोक्याचा इशाराही देतो.
- आशिया खंडात सर्वाधिक मृत्यू घोणसच्या दंशामुळे होतात.
- सापाच्या पिलांना सर्पमित्रांनी एका बादलीमध्ये घालून जंगलामध्ये सोडून दिले.