आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतूक पोलिसांच्या कारवाईत सावळागोंधळ, लोकांत संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली अाहे. कारवाई नियमाप्रमाणे करा. आधी सूचना फलक लावा, एकेरी वन वे मार्गाचे फलक लावा. नोटिफिकेशन काढा. मध्येच केव्हा तरी कारवाई सुरू केली जाते आणि जणू ‘उद्देश’ पूर्ण झाल्याने थांबवली जाते. अाम्ही काय समजायचे? असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
जागेवरच दंड भरण्याची तयारी असताना अारटीअो कार्यालयात पाठवून दिले जात आहेे. त्यामुळे जे काही दंड अाहे ते घ्या अन् गाडी सोडा असा संवाद बुधवारी दिवसभर पोलिस नागरिकांत रंगला होता. जप्त गाड्या पोलिस कल्याण केंद्रात अाणून लावल्या. तेथे तीन-चारशे वाहनचालकांच्या गर्दीमुळे गोंधळ उडतोय. नेमके काय करावे? हे पोलिसांना लोकांनाही कळेना झाले अाहे.

दोन दिवसांत सूचना : पुण्यातवाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करण्याअगोदर जनजागृती म्हणून जागोजागी माहिती देणारे फलक लावले अाहेत. याबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण यांना विचारले असता दोन दिवसात नव्या दंडाचे नोटीफिकेशन काढणार अाहे. त्यानुसार कारवाई होईल.

नियम आणि दंड
वनवे, नो पार्किंग झोन, मोबाइलवर बोलणे, वाहतूक अडथळा करून काॅर्नरला वाहने थांबवणे, ड्रेस कोड, बॅच बिल्ला नाही, सिग्नल तोडणे, फॅन्सी नंबर प्लेट, टींट ग्लास, ट्रीपल सिट (प्रत्येक व्यक्तीला पाचशे रुपये ), पीयूसी, अारसीबुक नाही, वाहन परवाना नाही या कलमाखाली पाचशे रुपये दंड अाहे. काका, मामा, बाबा, मालक ही नावे लिहिल्यास एक हजार रुपये दंड अाहे.

कारवाई सुधारणेस सूचना देतो
^शिस्त लावण्यासाठी कारवाई सुरू केली अाहे. नागरिकांनी शिस्त पाळावी. कागदपत्रे जवळ बाळगावीत. पोलिसांनी नागरिकांचे म्हणणे एेकून घ्यावे. सूचना देणारे फलक, लोकशिक्षण जागृती करूयात. अारटीअो अधिकारी यांना पोलिस कल्याण केंद्रात अाणता येईल का ते पाहूयात. लागलीच लोकांना दंड भरणे सोपे होईल. सिग्नल चालूच पाहिजे. मनपा लवकर सिग्नल चालू करून देत नाही. मॅन्युअलव्दारे नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या अाहेत.” नामदेवचव्हाण, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा
प्रसंग एक : मुलगा अॅडमिट, वन वे तून अाल्यामुळे गाडी पकडली : शिवाजीचौकात बुधवारी सकाळी स्वामी यांची गाडी पकडण्यात अाली. वन-वेतून प्रवेशचे कारण सांगितले. त्यांनी वन-वेत प्रवेश केला नाही. गाडी वळवताना पकडले. त्यांचा मुलगा एका रुग्णालयात अॅडमिट असल्यामुळे अौषधे घेण्यासाठी जात होते. कारवाईमुळे दुचाकीही जवळ नाही. अौषधे अाणण्यासाठी जायचे कसे? यामुळे ते वैतागले होते.
प्रसंग दोन : नियम तोडला नाही, तरीही दंड : डाॅ.अांबेडकर चौकातील (पार्क चौक) एका तरुण रस्त्याच्याकडेला दुचाकी लावून समोरील दुकानातून वडापाव खात होता. पोलिसांनी कारवाई करून मेमो दिला. दुचाकी गाडी पांढऱ्या खुणेच्या अातच होती. कारवाई कशी केली? पोलिस काहीच एेकण्याच्या मनस्थितीत होते. अन्यत्रही अशी वाहने थांबतात, कारवाई मात्र होत नाही.

प्रसंग तीन : अन् वाहतूक पोलिसाला बोलावून दंड केला : गांधीनगरचौकात एका साध्या वेषातील पोलिसाने तरुणाची गाडी अडवली. वाहन परवाना विचारला दाखविले. पीयूसी नाही म्हणून शंभर रुपये दंड केला. वाहनचालकाने गणवेश विचारला. यामुळे पोलिसाचा पारा चढला. त्याने फोन लावून गणवेशातील वाहतूक पोलिसाला बोलावून शंभर रुपयाची पावती केली. या कारवाईमुळे वाहतुकीला शिस्त येणार अाहे का?

फलक लावूयात
^नव्या दंडाची माहिती देणारे फलक संपूर्ण शहरात महत्त्वाच्या चौकात लावण्यात येतील. नव्या नियमाप्रमाणे दंड अाकारण्यात येत अाहे. नागरिकांनीही नियम पाळावेत.” बजरंगखारमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
बातम्या आणखी आहेत...