आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम मोडणाऱ्या ३०७ दुचाकींवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट वापरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या विरोधात वाहतूक पोलिस आरटीओ यांची संयुक्त कारवाई मोहीम सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे ३०७ वाहनांवर कारवाई झाली असून लाख हजार रुपयांचा दंड वसूल केला.

नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात प्रशासनाने कारवाई करत वाहने जप्त केली आहेत. शनिवार रविवार दोन दिवस आरटीओ कार्यालयास सुटी असल्याने सोमवारी दिवसभर आरटीओ कार्यालयात पैसे भरण्यासाठी वाहनचालकांना रांग लावावी लागली. ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक अजित ताम्हणकर, उदय साळुंखे, योगेश खैरनार, राजू नागरे, अनुपमा पुजारी आदींनी केली.

कारवाई सुरु राहील
नियमाचेउल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर अशा प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाईल. गैरसोय टाळण्यासाठी नियमांचे पालन करा.'' बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर.