आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा, रस्त्यावर उभ्या चारचाकींना जॅमर लावला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अडथळा करून थांबणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी बुधवारी कारवाईची मोहीम हाती घेतली. शिवाजी चौक, भागवत टाॅकीज परिसर, सरस्वती चौक, पार्क चौक, डफरीन चौक या मार्गावर मोहीम राबविण्यात अाली.

चारचाकी वाहनांना जॅमर लावण्यात अाले. दुचाकी तीन चाकी वाहनांना जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात अाली. वाहतूक अडथळयामुळे सोलापुरात जीवघेणी अपघात मालिका सुरू अाहे. या घटनेनंतर पोलिसांनी हे पाऊल उचलेले अाहे. या कारवाईत सातत्य राहिले तरच शिस्त लागेल. पार्क चौकात रात्री नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम घेण्यात अाली. बुधवारीही काही प्रमाणात अवजड वाहन फिरताना दिसत होते. शहरात प्रवेश बंदी असतानाही हे चित्र् पाहायला मिळाले. नियम तोडणाऱ्या अवजड वाहनांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...