आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतूक नियम तर आहेतच, पण रिक्षाचालक पालन करतील?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील मुख्य रस्त्यावर रिक्षाचालक बेदरकारपणे रिक्षा चालवतात. वाहतूक नियम पाळत नाहीत. अोव्हरसीट प्रवासी वाहतूक जोमात सुरू अाहे. यावर नियंत्रण कधी येणार असा प्रश्न अाहे. डिसेंबरपासून बॅच-बिल्ला लावणे, अोव्हरसीट प्रवासी वाहतूक करू नये, विशिष्ट ठिकाणीच थांबा घ्यावा, असे अावाहन रिक्षाचालकांना पोलिसांनी केले अाहे.

मागील वर्षभरापूर्वी असाच नियम करण्यात अाला होता. अाता पुन्हा मागील बुधवारी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस अायुक्त शर्मिष्ठा घारगे यांनी रिक्षाचालक संघटनांची बैठक घेऊन नियम केला अाहे. याची कार्यवाही सक्षमपणे होणार का हा महत्त्वाचा मुद्दा अाहे.

विजापूर रोड होटगी रस्ता ते शिवाजी चौक या मागार्गावर शेअर रिक्षा चालतात. अशीच स्थिती जुना पुणे नाका ते पाकणी फाटा, तुळजापूर रस्ता, अक्कलकोट रस्ता या मार्गावर पाहायला मिळते. रिक्षांमध्ये मुख्यत: तीन प्रवासी घेण्याची मुभा असताना अाठ-दहा प्रवासी वाहतूक होते. काही रिक्षाचालकांनी पाठीमागील बाजूस जाळी लावली अाहे. त्यातूनही प्रवासी वाहतूक सुरूच असते. काहीजण संगीत डेक (साऊंड सिस्टिम बाॅक्स) ठेवले असून त्यावर प्रवासी बसवितात. चौकात चालक सीटवर दोन-तीन प्रवासी बसवून घेतात. यावर कारवाई काही होत नाही. ट्रिपल सीट दुचाकीवर मात्र कारवाई होत नाही. शेजारील जिल्हे म्हणजे विजापूर, गुलबर्गा, पुणे या ठिकाणी रिक्षाचालक काटेकोरपणे नियम पाळतात. पोलिसांचे त्यांच्यावर अंकुश अाहे. सोलापुरात नियमांची अंमलबजावणी का होत नाही.

सक्षमपणे कारवाई करणार
^रिक्षा चालकांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्यासाठी सूचना देण्यात अाल्या अाहेत. डिसेंबरपासून नव्या नियमांची अंमलबजावणी होणार अाहे. जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार अाहे. रिक्षाचालक पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली अाहे. नियमांचे पालन झाले पाहिजेत.” कुमार अागलावे, पोलिस निरीक्षक

गरूड बंगल्याजवळ चुकीचा गतिरोधक
सातरस्त्याजवळील व्होडाफोन शोरूमजवळ (गरूड बंगला) येथे रंगभवनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बसविला अाहे. अाता नव्याने या ठिकाणी सिग्नल दिवे लावण्यात येत अाहेत. सिग्नल सुटल्यानंतर गतिरोधकावरून वाहने पुढे कशी जाणार. सिग्नल सुटल्यानंतर भरधाव वेगाने वाहने गेल्यास अपघात होण्याची शक्यता अाहे. महापालिका वाहतूक पोलिस यांच्यात नियोजन नसल्याचे यावरून दिसून येते. भविष्यात अपघात झाल्यास जबाबदार कोण? वाहतूक पोलिसांनी याची दखल घेण्याची गरज अाहे.

या नियमांची सक्ती
Áस्क्रॅपरिक्षाचालवू नका
Áफ्रंटसीटतीन पेक्षा जास्त प्रवासी घेता येणार नाही
Áपाठीमागील जाळीपूर्णत: बंद पाहिजे
Áरिक्षाचालकांजवळ वाहनपरवाना,कागदपत्रे पाहिजेत
Áबॅच बिल्ला लावावा, ड्रेसकोड पाहिजे
Áभरधाव रिक्षाचालकांवर कारवाई होणार
बातम्या आणखी आहेत...