आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक बंद, इंधनाचा सहा जिल्ह्यांत तुटवडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर सोलापूर - वाहतूक दरवाढीच्या मागणीवरून भारत पेट्रोलियमच्या पंपचालकांनी सोमवार (दि. १) पासून अचानक इंधन वाहतूक बंद केली. त्यांच्या या भूमिकेमुळे सहा जिल्ह्यातील भारत पेट्रोलियमच्या पंपावरील इंधन विक्री प्रभावित झाली आहे. पेच वाढल्यास इंधन तुटवडा निर्माण होऊ शकतो.
सोलापूरसह सहा जिल्ह्यातील पेट्रोलपंपांना तालुक्यातील पाकणी येथील बल्क डेपोतून इंधन पुरवठा केला जातो. यासाठी काही पंपचालक स्वत:चे टँकर वापरतात तर काही खासगी वाहतूकदार ही सेवा पुरवतात. यंदा निघालेल्या वाहतूक निविदात खासगी वाहतूक ठेकेदाराने गतवर्षीपेक्षाही कमी दरात बोली लावली. हा दर परवडत नसल्याचे सांगत पंपचालकांनी अचानक इंधन उचल बंद केली आहे. त्यामुळे त्यांच्या पंपावरील इंधनसाठा संपला आहे. त्यामुळे इंधन विक्री बंद झाली आहे. परिणामी वाहतूकदारांना आणि वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

^पंपमालक वाहतूकसंघटनेने अचानक काम बंद केले आहे. तरीही आम्ही वाहतूक सुरळीत ठेवली आहे. त्यांच्या संपाचा आम्ही फारसा परिणाम होवू देणार नाही.'' अमितसक्सेना, विभागीय अधिकारी, भारत पेट्रोलियम

^कंपनीचे वाहतूकदर हे परवडणे शक्यच नाही. खासगी वाहतूकदार वाटेल त्या दरात वाहतूक करण्यास तयार आहेत. परवडतील असे दर द्यावे.'' महेंद्र लोहकरे, सचिव, पेट्रोल पंप आसोसिएशन
बातम्या आणखी आहेत...