आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्गत वाहतुकीमुळे वाचला लोकांचा त्रास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दहादिवसांचा गणपती उत्सव आणि त्यानंतरची विर्सजन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी महिनाभरापासून तयारी सुरू केली होती. कुठेही अनुचित प्रकार घडता उत्सव अानंद भक्तिमय वातावरणात पार पडला. अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचे दिसून आले.
डाॅल्बीचा वापर जवळजवळ नाही असाच होता. रस्त्याच्या एका बाजूने मिरवणूक तर दुसऱ्या बाजूने अंतर्गत वाहतूक सुरू ठेवल्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका बसला नाही. बाहेरहून अालेल्या नागरिकांना बसस्थानक रेल्वे स्थानक भागात ये-जा करणे सोयीचे झाले. दरवर्षी बसणारा ढिसाळ नियोजनाचा फटका यंदा बसला नाही.

गुरुवारी सकाळी सात वाजता पोलिस बंदोबस्त सुरू झाला तो शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता. विजापूर रोड होटगी रोड मध्यवर्ती मंडळ मिरवणूक मार्गाची जबाबदारी पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यावर तर लोकमान्य आणि मध्यवर्ती मंडळाची जबाबदारी उपायुक्त अपर्णा गीते, पूर्वभाग मंडळाची जबाबदारी उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे होती.
सातही पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी अापापल्या हद्दीतील बंदोबस्ताचे नियोजन केले होते.
Áपोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी प्रत्येक मंडळ, मध्यवर्ती मंडळ, पोलिस ठाण्यानुसार शांतता कमिटीच्या बैठका घेतल्या. डाॅल्बीबाबत जनजागृती अादी उपाययोजना केली.

Áसंवेदनशील भागात शांतता कमिटी सदस्य आणि मध्यवर्ती मंडळांचे अध्यक्ष नियोजन करत होते.
Áनागरिकांनीही स्वयंशिस्त पाळून पोलिसांना साथ दिली.
Áनिवृत्त पोलिस, पोलिस छात्र मित्रांची चांगली मदत झाली.
Áबंदोबस्तातील पोलिसांना सकाळी नाश्ता, दुपारी रात्री दोन वेळा जेवण जागेवरच देण्यात अाले.

नियोजन सक्षम
यंदा वाहतूक पोलिसांनी वेगळा प्रयोग केला. रस्त्याची एक बाजू मोकळी ठेवली. चौकात, गर्दीच्या ठिकाणी मिरवणूक अाल्यानंतर तात्पुरत्या काळासाठी वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात येत होती. यामुळे लोकांना मानसिक त्रास झाला नाही. एसीपी महिपती इंदलकर, पीअाय कुमार अागलावे आणि त्यांच्या पथकांनी चांगलीच मेहनत घेतली.
बातम्या आणखी आहेत...