आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिकीट ऑनलाइन रद्द, परताव्यासाठी पायपीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्थानकावर काढलेले अारक्षित तिकीट १३९ क्रमांकावर फोन करून अथवा अाॅनलाइन रद्द करण्याची सुविधा उपलब्ध झाली असली तरी परताव्यासाठी प्रवाशास स्थानकावरील अारक्षण खिडकीवरच जावे लागते. परिणामी या सुविधेचा लाभ घेण्यात प्रवाशांचा थंडा प्रतिसाद मिळतो आहे. आठवड्यातून दोन-तीन प्रवाशांनीच ऑनलाइन पध्दतीने रद्द केलेल्या तिकिटांचा परतावा स्थानकावर येऊन घेतला अाहे.
यापूर्वी केवळ ई-तिकीटच ऑनलाइन पध्दतीने रद्द करता येत असे. आता आरक्षण केंद्रावरील तिकिटेही रद्द करता येतात. प्रवाशी ऑनलाइन तिकीट रद्द करण्यासाठी तिकीट सेंटरवर जावू शकतात. त्यासाठी सेंटरकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तिकीट काढताना मोबाइलचा जो क्रमांक दिला त्या मोबाइल क्रमांकावर तिकीट रद्दचा संदेश येतो. यातच तिकिटाच्या परताव्याची रक्कम दिलेली असते. गाडी सुटण्यापूर्वी किमान चार तास आधी तिकीट रद्द करता येते. वेटिंग अथवा आर-एसी असेल तर गाडी सुटण्याआधी ३० मिनिटे आधी तिकीट रद्द करता येते. जर आरक्षित तिकीट वेळेपूर्वी रद्द केले, तर देशातील कोणत्याही स्थानकावरील आरक्षण केंद्रावरून तिकिटाची उर्वरित रक्कम मिळते.

मोबाइलवरचा कोड खिडक्यांवर दाखवा
ऑनलाइन तिकीट रद्द केल्यानंतर मोबाइलवर कोड मिळतो. स्थानकावर जाऊन मेेसेज दाखवून परतावा घ्यावा लागतो. ही सुविधा निर्धारित वेळेनुसार धावणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत लागू असेल. उशिराने धावणा ऱ्या अथवा रद्द झालेल्या गाड्याच्या बाबतीत ही सुविधा लागू नसेल.
^प्रवाशांच्या सोयीसाठीआरक्षण केंद्रावरील तिकीटही आता ऑनलाइन रद्द केले जात आहे. यामुळे वेळेत बचत होईल. नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई
बातम्या आणखी आहेत...