आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेमंत्र्यांनी काही मिनिटांत प्रश्न सोडवला, स्थािनक यंत्रणा सुस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हुतात्मा एक्स्प्रेसच्या एका डब्यात गर्दी झाल्याने वैतागलेल्या प्रवाशाने थेट केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विट केले. त्यामुळे दिल्लीपासून हुतात्माच्या क्रमांच्या डब्यापर्यंतची यंत्रणा खडबडून हलली. काही मिनिटात प्रवाशाची समस्या दूर झाली. प्रत्यक्ष कार्यवाही करणारी यंत्रणा स्थानिकच होती. पण हीच यंत्रणा विभागातील समस्या, कोटीव्हीएम प्रश्नी सुस्त असल्याचा अनुभव येत आहे.
सोलापूर रेल्वेप्रवाशांनी चालू तिकीट काढण्यासाठी स्थानकावर तिकीट खिडक्यांसमोर रांगेत उभे राहून ितकीट काढू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून कोटीव्हीएम मशीन सोलापूर स्थानकावर बसवले. मात्र गेल्या आठवड्यापासून मशीन बंद अवस्थेत आहे. सलग सुट्यांमुळे बुधवारी हुतात्मा इंद्रायणी एक्स्प्रेसला प्रवाशांची गर्दी खूप होती. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी खिडक्यांसमोर लांब रांगा होत्या. येथे मशीन असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती पाहण्यास मिळाली.
सलग सुट्यांमुळे बुधवारी सोलापूरहून पुणे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी होती. प्रवाशांना जनरल तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहू नये यासाठी स्थानकावर एटीव्हीएम को टीव्हीएम मशीन बसवले आहेत. सोलापूर स्थानकावर सध्या चार कोटीव्हीएम तर सात एटीव्हीएम मशीन आहेत. चार कोटीव्हीएममधील दोन मशीन बंद अवस्थेत आहे. काही एटीव्हीएमला फॅसिलेटर असते तर काही एटीव्हीएमला फॅसिलेटर नसते. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने खिडक्यांवर येऊन तिकीट काढावे लागते. काही प्रवासी जनरल तिकीट काढण्यासाठी अधिक वेळ जातो यासाठी तिकीट काढताच प्रवास करतात. कोटीव्हीएम तत्काळ सुरू करणार असल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शर्मा यांनी सांगितले.
सोलापूर सोलापूरहूनपुण्याला जाणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसच्या आरक्षित कोचमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याचा त्रास आरक्षित तिकीटधारकांना होऊ लागला. गर्दी हटवण्यासाठी डी मधील एका प्रवाशाने थेट रेल्वे मंत्र्यांना ट्विट केले. त्यानंतर काही मिनिटांतच त्या डब्यातील गर्दी हटवली गेली आणि अारक्षण असलेल्या प्रवाशांनी सुटकेचा िन:श्वास सोडला.
बुधवारी सकाळी हुतात्मा एक्स्प्रेसला अडीचशे ते तीनशे प्रवाशांचे वेटिंग होते. त्यामुळे सर्व डब्यांत गर्दी होती. डी या डब्यातही मोठी गर्दी होती. ५४ क्रमाकांच्या सीटवरील राजेश जाजू या प्रवाशाने आपल्या ट्विटर अकौंटवरून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विट करून अडचण मांडली. प्रभू यांचे ट्विटर हाताळणाऱ्या चमूने याची तत्काळ दखल घेतली. जाजू यांना पीएनअार आणि अधिक माहिती देण्याचे आवाहन केले. जाजू यांनी माहिती ट्विट करताच सोलापूरचे डीआरएम अजयकुमार दुबे यांना त्वरित योग्य ती कारवाई करण्याचे सांगण्यात आले. डीआरएम दुबे यांनी सोलापूर रेल्वे नियंत्रण कक्षास आदेश दिला. डी डब्याच्या तिकीट पर्यवेक्षकाला रेल्वे िनयंत्रण कक्षाकडून फोन गेला. तिकीट पर्यवेक्षक वाय. एम. जमखंडी यांनी राजेश जाजू यांना भेटून त्यांची अडचण समजून घेतली अन् डब्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यांत पाठवण्यात आले.
सोलापूर महिलांच्याडब्यातून पुरुषाने प्रवास करणे हा दंडनीय अपराध आहे. मात्र िनयम धाब्यावर बसवून अनेक पुरुष प्रवासी महिलांच्या डब्यातून प्रवास करतात. बुधवारी सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या सोलापूर - पुणे इंटरसिटी (इंद्रायणी एक्स्प्रेस) इंजिनच्या पाठीमागे जोडलेल्या महिला डब्यात पुरुष प्रवासी मोठ्या संख्येेने आढळून आले. स्थानकावरील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी पुरुष प्रवाशांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनाही जुमानता पुरुष प्रवाशांनी महिलांच्या डब्यात बसणेच पसंद केले.

रेल्वे नियम १६२ प्रमाणे महिलांच्या डब्यातून पुरुषाने प्रवास करणे हा गुन्हा आहे. महिन्यांपर्यंत कैद अथवा ५०० रुपये आर्थिक दंड होऊ शकतो. मात्र, याची कोणतीच तमा बाळगता पुरुष प्रवासी प्रवास करतात. पूर्वी महिलांचा डबा सर्वसाधारण डब्यात जाण्यासाठी आरपीएफ लोहमार्ग पोलिस प्रवाशांना रांगेतून डब्यात प्रवेश देत होते. आता तशी व्यवस्था नाही. त्यामुळे डब्यात चढण्या-उतरण्यावरून प्रवाशांमध्ये वाद होतात. कधी कधी हमरी तुमरी होते.

^महिलांच्या डब्यातूनप्रवास करणाऱ्या पुरुषांवर कारवाई करण्यात येईल. संबधित विभागाला कारवाईचे आदेश देण्यात येईल. आर. के. शर्मा, वरिष्ठविभागीय वाणिज्य व्यवस्थापक