आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग सुट्यांमुळे रेल्वेगाड्या फुल्ल, ‘हुतात्मा, इंद्रायणी, सिद्धेश्वर’ला १८ पर्यंत वेटिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वेचासुटीचा हंगाम नसला तरीही सलग सुट्या आल्याने सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. लांबपल्याच्या महत्त्वाच्या गाड्यांनाही वेेटिंग सुरू आहे.

उन्हाळा आणि हिवाळ्यात शाळांना सुट्या असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवासाचा बेत आखतात. त्यामुळे गाड्या फुल्ल होतात. पण आता आॅगस्ट महिन्यात सुट्या लागून आल्याने अनेकांनी परगावी जाण्याचे तर काहींनी सोलापूरला येण्याचे नियोजन केल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोलापूरहून जाणाऱ्या आणि परतणाऱ्या गाड्यांना वेटिंग सुरू आहे. सुट्या संपल्या की गर्दी ओसरेल, अशी माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. थाॅमस यांनी दिली.

चार दिवसांचे नियोजन
ऑगस्टमहिन्यातील १५, १६ आणि १८ तारखेला शासकीय सुटी आली आहे. केवळ सोमवारची (१७ ऑगस्ट) सुटी काढली तर सलग चार दिवसांची सुटी घेता येते, हे लक्षात घेऊन अनेकांनी सुटीचे नियोजन केले आहे.

यागाड्यांना वेटिंग
सोलापूर-पुणेहुतात्मा, इंद्रायणी, सिद्धेश्वर आणि सोलापूर-मुंबई एक्स्प्रेसला १८ पर्यंत वेटिंग आहे. दक्षिणेकडे जाणाऱ्या सोलापूर-यशवंतपूर, बसवा, सोलापूर-बेंगळुरू उद्यान, चेन्नई एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेस आदी गाड्यांना २३ ऑगस्टपर्यंत वेटिंग आहे.