आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्तांनी हायकोर्टात भरला दंड, याचिका सुनावणीस गैरहजेरी, रक्कम ३० हजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका परिवहन विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या याचिका प्रकरणात मनपा आयुक्तांवर न्यायालयात ३० हजारांची दंड भरण्याची पाळी आली.
परिवहनच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात महापालिकेने आपले मत दिले नाही. वारंवार न्यायालयात गैरहजर राहिले. महापालिका प्रशासनाकडून कोेणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून न्यायमूर्ती अनुप माेहता, जी. एस. कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांना दहा हजारांचा दंड केला. त्यास महापालिका आयुक्तांनी प्रतिसाद दिला नाही म्हणून पुन्हा १४ सप्टेंबर रोजी २० हजार असे एकूण ३० हजारांचा दंड केला. पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी आहे.

महापालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त प्रदीप साठे, विधान सल्लागार अरुण सोनटक्के यांनी १९ सप्टेंबर रोजी न्यायालयात ३० हजार भरले. त्यासोबत दोन प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात ३० हजार दंड माफ करा परिवहनची आर्थिक स्थिती उत्तम नाही, त्यामुळे तूर्त लागू केले नाही असे म्हटले आहे. याचिका कर्त्यांच्या वतीने अॅड. विश्वास देवकर हे काम पाहत आहेत.

भुर्दंड महापालिकेला
अधिकाऱ्यांची चूक असताना सर्वसामान्य नागरिकांच्या करातून वसूल केलेले ३० हजार मनपा न्यायालयात भरले. न्यायालयातील याचिकाबाबतीत महापालिका आयुक्तांना परिवहन विभागाने कोणतीच माहिती दिली नाही. न्यायालयात हजर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने आयुक्तांना ३० हजार दंड करूनही महापालिका आयुक्तांनी दोषी कोणाला धरले नाही. परिवहन विभागाच्या संंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही हे विशेष.
बातम्या आणखी आहेत...