आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक नियोजनामध्ये नाही सुसूत्रता, पीआयची पदे रिक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील वाहतूक नियोजनात सुधारणा करण्यास वाव आहे. चुकीच्या दिशेने होणारी वाहनांची ये-जा, दुचाकीवर तीन-तीन जण जाणे, अॅपेरिक्षा, तीन अासनी रिक्षांमधून अोव्हरसीट प्रवासी वाहतूक या बाबी नित्याच्या झाल्या आहेत. डफरीन आणि सरस्वती चौकांतील सिग्नल नियमित सुरू असतात. अन्य चौकांतील सिग्नल बंदच असतात.
तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील घार्गे आणि एस. बी. वाघमारे यांची बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात अाले. पण, तेथे अद्याप नियुक्ती झालेली नाही. एपीअायच कारभार पाहत आहेत. परिणामी वाहतूक नियोजनात सुसूत्रता नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरातील महत्त्वाच्या चौकांत, रस्त्यावर ये-जा करण्यास नागरिक शाॅर्टकटचा मार्ग म्हणून चुकीच्या दिशेने ये-जा करतात. यामुळे वारंवार किरकोळ अपघात होत अाहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत नाही. नवीवेस पोलिस चौकी ते शिवाजी चौक या मार्गावर बॅरेकेडिंग लावले आहेत. मात्र, काही ठिकाणी वाहनांना ये-जा करण्यास जागा सोडल्याने वारंवार वाहतूक खोळंबा होत आहे. जे नियम तोडतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबर वारंवार नियम तोडणाऱ्यांना समन्स देणे अथवा वाहन परवाना काही कालावधीसाठी रद्द करणे असे नियम केल्यास वाहतुकीला शिस्त येण्यास मदत होईल.

जुना एम्प्लाॅयमेंट चौक, पत्रकार भवन, गांधी नगर, रंगभवन, संत तुकाराम चौक, शांती चौक, अशोक चौक (कायमस्वरूपी काढून टाकण्यात अाले अाहे.) जुना बोरामणी नाका ( नऊ मेच्या अपघातात एक खांब पडला अाहे), अासरा जुना होटगी नाका (महावीर चौक), सिव्हिल चौकात कधी चालू तर कधी बंद असतात. भय्या चौक गुरूनानक चौकात दीड वर्षांपूर्वी सिग्नल दिवे कार्यान्वित करण्यात अाले. अातापर्यंत ते वापरात अाणले नाहीत.

मनपाचे दुर्लक्ष
सिग्नल दुरुती देखभाल करण्याचे काम महापालिकेचे तर वाहतूक सिग्नल नियोजन करण्याचे काम पोलिसांचे अाहे. सिग्नल बंद पडल्यानंतर वारंवार सूचना देऊनही मनपा प्रशासन दखल घेत नसल्याचे एकूण कामकाजावरून दिसून येते.

लवकरच नियोजन करू
^सिग्नल बंद बाबतमहापालिकेला पत्र दिले आहे. शहरातील पंधरा सिग्नलमधील नऊ सिग्नल चालू अाहेत. उर्वरित चालू करण्यास महापालिका अधिकारी अामची बैठक झाली अाहे. त्यांना पत्र दिले असून लवकरच नियोजन होईल.” नामदेव चव्हाण, पोलिसउपायुक्त

शहरात सात पोलिस निरीक्षकांची बदली झाली अाहे. इतर जिल्ह्यांतून १३ जण बदलून येत असून पाच-सहा अधिकारी अाता अाले अाहेत. नव्याने बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी सक्षम अधिकाऱ्यांकडे वाहतूक शाखेचा पदभार देणार असल्याचे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी सांगितले.