आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परिवहन’ला दोन महिन्यांचा पगार २४ पर्यंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत थकीत दोन महिन्यांचा पगार देऊ. उर्वरित दिवसात महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता राहिलेल्या एका महिन्याचा पगार देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना दिले.
उत्पन्न वाढवण्याची सूचना महापौरांनी केली. पगार होतील इतके उत्पन्न वाढवण्यास पक्षनेते संजय हेमगड्डी यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, परिवहन सभापती राजन जाधव, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक श्रीकांत म्याकलवार, लोंढे, सिद्धप्पा कलशेट्टी आदींची उपस्थिती होती.

कर्मचारी वेतन असे
कायम: ५०९, बदली : १०२, कंत्राटी : ३५०, एकूण : ९६१
प्रतिमाह पगार : कोटी २० लाख
बातम्या आणखी आहेत...