आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आॅफिसर्स क्लबमधील झाडांच्या परवानगीविनाच तोडल्या फांद्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आॅफिसर्स क्लबमधील वृक्षांवर कुऱ्हाड चालवल्याच्या प्रकरणाने बेकायदा वृक्षतोडीवर नियंत्रण वृक्षसंवर्धनासाठी प्रबोधन मोहीम राबवणाऱ्या महसूल यंत्रणेचा बेगडीपणा समोर अाला अाहे. प्रांताधिकारी म्हणाले, फांद्या तोडण्याबद्दल तोंडी बोलणे झाले अाहे. परवानगीबाबत महापालिकेकडे चौकशी केली असता तीन दिवसांतील काहीच माहिती नसल्याचे सांगून उद्यान विभागाने कानावर हात ठेवलेे. यावरून महापािलका महसूल प्रशासन वृक्षसंवर्धन नियमांबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले.

गेल्या तीन दिवसांपासून पोलिस अायुक्तालयासमोरील ऑफिसर्स क्लबमधील झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडण्यात येत आहेत. महापालिका उद्यान विभागाकडून लेखी परवानी घेण्याची तसदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतलीच नाही. मंगळवारी रात्री उशिरा ऑफिसर्स क्लबमधील वडाच्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू होते.

बुधवारीही ते काम चालूच होते. तोडलेल्या फांद्या ट्राॅलीत भरून अन्यत्र हलविल्या. वाहन पार्किंगसाठी पारंब्या अडथळा ठरत होत्या म्हणून तोडण्यात आल्याचा खुलासा महसूल अधिकाऱ्यांनी केला. पण प्रत्यक्षात नियमानुसार परवानगी घेतलेली नाहीच.

पूर्वपरवानगी गरजेचीच
^तीन दिवसांपासून बाहेरगावी असल्याने परवानगीबाबतची माहिती मला नाही. पण झाड किंवा फांद्या तोडण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असते.'' अजय चव्हाण, उद्यान विभागप्रमुख, मनपा
फोनवरून कळवले

^वाहनतळ करण्यासाठी फांद्या तोडल्या आहेत. त्यासाठी महापालिका उद्यान विभागास फोनवरून कळवले आहे.'' शहाजी पवार, प्रांतािधकारी