आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१-७ एकवटले सोलापूरकर, लाख रोपे लावियली भूवरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - १-७ या तारखेला साजेसे सारेच एकमेकांच्या साथीला आले. हाती रोपे घेऊन भूवरी लावू लागले. पाहता, पाहता लाख २२ हजार ७८१ रोपे दुपारपर्यंत लावून झाली. शहर आणि जिल्हा हिरवेगार करण्याच्या स्वप्नाला अंकुर फुटले. निमित्त होते, शासनाच्या कोटी वृक्षलागवड अभियानाचे. त्यात सोलापूरने भरीव योगदान दिले.
‘झाडं लावली भारंभार, शिवार होईल हिरवेगार, दारी वृक्षाचा पहारा - देऊ पक्ष्यांना आसरा’ अशा घोषणा देत, जनजागृती फलक घेत गावोगावी वृक्षदिंड्या निघाल्या. वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन वृक्षमित्र, शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी वृक्षलगवडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहर आणि जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल आठ लाख रोपे लावली गेली.

दोन महिने नियोजन
हरित महाराष्ट्र अभियानच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय वनविभागाने घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून त्याबाबतचे नियोजन सुरू होते. सोलापूर जिल्ह्यात सहा लाख ३८ हजार झाडे लावण्याचे उदिष्ट होते. पण, वाढत्या लोकसहभागामुळे दुपारीच उद्दिष्टपूर्ती झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते शहरातील सिद्धेश्वर वनविहार येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी रणजित कुमार, उपवनसंरक्षक सुभाष बडवे, उपसंचालक बी. एन. सकट आदी उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी जिल्ह्यात १२४२ ठिकाणांची निवड वनविभागातर्फे केली होती.

मुनगंटीवारयांनी साधला मोबाइलवरून संवाद
भंडारक वठे येथील वनक्षेत्रात २४ हजार झाडे लावण्यात आली. आमदार सुभाष देशमुख यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना थेट मोबाइलवर संवाद साधून उपस्थितांशी हितगुज साधण्याची विनंती केली. वनमंत्री मुनगंटीवार यांनी तेथील सहभागींना शुभेच्छा दिल्या. २४ हजार झाडे लावून तेवढ्याच लोकांना प्राणवायू उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत झाडांच्या संवर्धनात सहभागाची विनंती केली.

दोन वाजेपर्यंत वनविभागाची उद्दिष्टपूर्ती
जिल्ह्यातील साडेसहा लाख झाडांपैकी लाख ७६ झाडे लावण्याचे उद्दिष्ट वनविभागाचे होते. वनविभागाने त्याचे नेटके नियोजन केले होते. सकाळी सहा वाजल्यापासून लागवडीस सुरवात झाली. प्रत्येक तासाला लागवडीचा अहवाल घेण्यात येत होता. सकाळी नऊ ते ११ या दोन तासांच्या कालावधीत सर्वाधिक ६५ ते ७० टक्के वृक्षलागवड झाली होती.

सेल्फी वीथ ट्री
झाडे लावल्यानंतर मोबाइलवरून त्यासमवेत छायाचित्र घेण्यात येत होते. अनेकजण व्हॉटसअप, फेसबुकवर अपलोड केले. वनमंत्रालयाने सेल्फी वीथ ट्रीचे फोटो त्यांच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे कळवले होते. निवडक छायाचित्र विजेत्यांना व्याघ्र प्रकल्प किंवा पुणे विभागातील वनक्षेत्रात सवलतीमध्ये पर्यटनाची संधी मिळणार आहे.


पुढील आठवड्यात पुण्यात आढावा
संपूर्ण राज्यात दोन कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्याचे पुढील धोरण ठरविण्यासाठी जुलैला पुण्यातील यशदा येथे वनमंत्री मुनगंटीवार यांनी राज्यस्तरीय बैठक आयोजिली आहे. लावलेल्या झाडांचे संरक्षण संवर्धनाबरोबर पुढील धोरण यामध्ये निश्चित होईल. तसेच, कोटी वृक्षलागवड अभियानातील अनुभव, नागरिकांचा प्रतिसाद अपेक्षांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक जीत सिंग यांनी सांगितले.

३२ हजार लोकांचा उत्स्फूर्त सहभाग
वृक्षलागवडमोहिमेत शाळा महाविद्यालयीन युवक-युवती आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदगुरू साधकांचा सहभाग लक्षणीय होता. जय सदगुरूचा जयघोष करीत त्या साधकांनी मोठ्या उत्साहात मोहिमेत सहभाग घेतला. त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, निसर्ग मंडळ, पतंजली योग केंद्र, रोटरी क्लब, लायन्स क्लब, महिला बचत गटांसह शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते. २५ हजार स्वयंसेवकांच्या सहभागाचा वनविभागाचा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात ३२ हजार लोक वृक्षारोपणात सहभागी झाले.
बातम्या आणखी आहेत...