सोलापूर - दोनकोटी वृक्षलागवड अभियानात लावण्यात आलेल्या झाडे त्यांची सद्यस्थिती ऑनलाइन दिसतील, असे वनविभागातर्फे सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात त्याबाबतची छायाचित्रे संगणकावर दिसत नाहीत.
गुगलने अपडेट केल्यानंतर ती दिसतील, अशी उत्तरे आता वनविभागातर्फे देण्यात येत आहेत.
वनमंत्रालयाने मोठा गाजावाजा करीत हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत दोन कोटी वृक्षलागवड अभियान राबविले. त्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात तब्बल पावणेसहा लाख झाडे लावण्यात आली. उपग्रहाच्या माध्यमातून झाडांच्या नोंदी, त्यावर नियंत्रण ठेवण्याची वनविभागाची घोषणा वनविभागाने केली होती.
२६ सप्टेंबर जागतिक वृक्ष दिनाच्या निमित्ताने हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नात ही वस्तुस्थिती समोर आली.
सोलापूर जिल्ह्यात पाच लाख ७६ हजार झाडे लावण्याचे उदिष्ट वनविभागाचे होते. विविध स्वयंसेवी संस्था, नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्ह्यात तब्बल पाच लाख ८९ हजार ४३४ झाडे वनविभागाने एकाच दिवशी लावली. त्या अभियानमध्येच खासगी क्षेत्रावर तीन लाखे झाडे लावली होती.
वनविभागाने लावलेल्या झाडांच्या ‘जीपीएस’ (उपग्रहाद्वारे) नोंदी करण्यात आल्या. अभियानाच्या नियोजनासाठी वारंवार बैठका घेण्यात आल्या. ‘जीपीएस’लोकेशनद्वारे लावलेल्या झाडांची सद्यस्थिती त्वरित दिसेल, असे वनअधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार झाडांचे फोटो दिसत नाहीत. वनअधिकाऱ्यांनी केलेल्या घोषणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जुलै महिन्यातील वृक्षारोपणानंतर पावसाने आेढ दिल्याने काही झाडं जळाली. वृक्षारोपणानंतर १० ते २० टक्के झाडं जळतात (मरअळी) असे गृहितधरून वनविभागातर्फे त्या ठिकाणी नवीन झाडं लावण्यात आल्याचे वनप्रशासनातर्फे सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात झाडं लावली का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
‘सेल्फी’चानिकाल रखडला
वनविभागानेअभियानच्या निमित्ताने ‘सेल्फीविथ ट्री’ असे उपक्रम राबविला. वनविभागाच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या निवडक सेल्फी फोटोंची निवड करून विजेत्यांना व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनासाठी सवलत देण्याची घोषणा केली. सोलापूर शहर जिल्ह्यातून अनेकांनी झाडांसमवेतचे सेल्फी फोटो अपलोड केले. अडीच महिन्याचा कालावधी लोटला असून अद्याप त्याबाबतचा निकाल जाहीर झाला नसल्याने, निसर्ग प्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
गुगल अपडेटनंतर दिसेल
^झाडेलावण्याच्या ठिकाणची वनविभागाने ‘जीपीएस’ नोंदणी केली आहे. गुगलच्या माध्यमातून निरीक्षण करणार आहोत. ‘गुगल’ने त्यांचे सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंर ती माहिती दिसणार आहे. संबंधित कंपनी तीन ते चार महिन्यांनी अपडेट करत असून त्यानंतर पुढील अपडेट होईपर्यंत सद्यस्थिती दिसेल.” संजयमाळी, उपवनसंरक्षक, सोलापूर
दिव्य मराठी विशेष