सोलापूर - मुत्सद्दी, पडद्यामागचा शिल्पकार आदी शब्दांत राजकारणातील मान्यवरांनी ज्येष्ठ राजकारणी विष्णुपंत कोठे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले. त्यांच्या अनुभवाचा
आपल्याला फायदा मिळाला, असेही काहींनी सांगितले. तर काहींनी त्यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल नमूद करत आदरांजली वाहिली.
दांडगा जनसंपर्क असलेला नेता
आमच्या कुटुंबाशी ७० वर्षांपासून संबंध होते. अचूक निर्णयक्षमता असलेले व्यक्तिमत्त्व होते. ते पक्षाचे निष्ठावंत नेता होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. कितीही कठीण अडचणी असल्या तरी ते सोडवत. राजकारणातील चांगले व्यक्तिमत्त्व गेल्याने दु:ख होत आहे.”
प्रा.सुशीला आबुटे, महापौर
चांगले नेतृत्व हरपले
Ãसर्वसामान्यकार्यकर्त्यांनासोबत घेऊन शहराची प्रगती करण्याचा प्रयत्न केला. सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीचे व्यवस्थापन ते पाहत. पद्मशाली समाजाचे चांगले नेतृत्व आज हरपले.”
प्रवीणडोंगरे, उपमहापौर
अचूक नियोजन करणारे
पदावर राहता काम करणारा नेता होता. अचूक नियोजनामुळे ते राजकारणात यशस्वी होत. गरीब, निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून काम करून घेऊन त्यांना त्याचा मोबदला म्हणून पदही देत. कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता होता. त्यांनी अनेकांना नगरसेवक केले. अडचणीतून मार्ग काढणारा नेता हरपला.
विजयकुमार देशमुख, पालकमंत्री
मदतीला धावून जाणारा
काँग्रेस एकत्रितअसताना जवळचा संबंध आला होता. पक्षीय राजकरणापेक्षा सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सोलापुरातील अनेक प्रश्न धसाला लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जनतेशी नाळ त्यांनी कधी तोडली नाही. सोलापूरच्या विकासातील त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहील.” विजयसिंहमोहिते, खासदार
सोबत घेऊन जाणारा नेता
जाणकार नेते होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या गैरहजेरीत सोलापुरातील काम ते पाहत. त्यांचे पूर्व भागावर वर्चस्व होते. सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता हरपला.”
अॅड.शरद बनसोडे, खासदार
ज्येष्ठ मार्गदर्शकास मुकलो
मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालवत असतानापासून संबंध होते. कमी संपर्कातही त्यांचे माझे संबंध अधिक जिव्हाळ्याचे होते. राजकीय तसेच वैयक्तिक बाबतीतही मी त्यांचा सल्ला घेत असे. त्यांच्या निधनाने आम्ही राजकारणातील एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो आहोत.”
दिलीपसोपल, आमदार,बार्शी
महापालिकेचे समीकरण
एक चांगला संघटक गेला. सोलापूर महापालिका तात्या कोठे असे समीकरण होऊन गेले होते. त्यांच्या निधनाने शहर- जिल्हा एका चांगल्या संघटकाला मुकला आहे.”
सिद्धारामम्हेत्रे, आमदार,अक्कलकोट
जिल्ह्याचेमोठे नुकसान
काँग्रेसचे निष्ठावानकार्यकर्ते होते. सुशीलकुमार शिंदे यांच्यासमवेत त्यांनी प्रदीर्घ काम केल्याने त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.”
बबनरावशिंदे, आमदार,माढा
राजकारणातीलउत्तुंग व्यक्तिमत्त्व
सोलापूरच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आज हरपले. पडद्यामागे राहून त्यांनी खासदार, आमदार नगरसेवकांना निवडून आणले. ते स्वत:साठी काहीही करता दुसऱ्यांसाठी झटणारे व्यक्तिमत्त्व होते. मला विधान परिषदेत आमदार म्हणून पाठवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.”
सुभाषदेशमुख, आमदार,दक्षिण सोलापूर
जुने,जाणते नेतृत्व
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील एक जुने, जाणते नेतृत्व होते. पडद्यामागे राहून मुत्सद्देगिरीतून अनेक राजकीय घडामोडी त्यांनी घडवल्या होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते पुढे आले होते. विश्वास प्रामाणिकपणाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”
प्रशांतपरिचारक, आमदार
चाणाक्ष व्यक्तिमत्त्व
अचानक गेल्याने वाईट वाटले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. माझ्या जन्माआधीपासून तात्यांची आणि सुशीलकुमार शिंदे यांची मैत्री होती. एक अतिशय चाणाक्ष असं त्यांच व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणं नाही. त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकले. त्यांची सोलापूरला कायम उणीव जाणवेल.”
प्रणितीशिंदे, आमदार
कुशल संघटक
मितभाषी,परंतुकुशल संघटक अशी त्यांची ओळख होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कर्तृत्वाने त्यांनी समाजात ठसा उमटवला होता. समाजमनाची जाण असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. एक चांगला मोहरा गळाल्याची खंत वाटते”
राजनपाटील, अध्यक्ष,जिल्हा मध्यवर्ती बँक
शिंदे यांच्या वाटचालीत वाटा
आम्ही दोघांनी अनेक वर्षे एकत्रित काँग्रेसचे काम केले. त्यांनी काँग्रेस पक्षाची निष्ठेने सेवा केली. सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. कार्यकर्त्यांची कदर करणारा सच्चा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे.”
आनंदरावदेवकते, माजीमंत्री
सत्तासूत्रे उत्तमपणे सांभाळली
माझी विधानपरिषदेवर निवड झाली. त्यानंतर महापालिकेतील सत्तासूत्रे कोठे यांच्या हाती गेली. त्यांनी ती उत्तमपणे सांभाळली. सर्व जाती-धर्मातील लोकांना संधी देत त्यांनी पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व टिकवले. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर त्यांनी अखेरपर्यंत निष्ठा ठेवली. काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता कसा असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तात्या. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेेत्राचे मोठे नुकसान झाले.''
युनूसभाईशेख, माजीआमदार
जातीभेद केला नाही
विष्णुपंत कोठे अतिशय सामान्य होते. सुशीलकुमार शिंदे यांच्याशी गट्टी जमली. त्यानंतर ते राजकारणात आले. समाजकारणात सहभाग घेतला. महापालिकेची सत्तासूत्रे सांभाळताना त्यांनी कुठलाच जातीभेद केला नाही, हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य. पालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व टिकण्यात त्यांचाच मोठा वाटा आहे. श्री. शिंदे यांच्यावर ४० वर्षे निष्ठा ठेवून त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केले.''
नरसय्याआडम, माजीआमदार
कार्यकर्त्यांना घडवले
कार्यकर्ते घडवले.सर्वांना आवडणारे आणि कुशल नियोजन करणारे नेतृत्व होते. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. १९९९ मध्ये महापौर असताना त्यांनी पुन्हा काँग्रेसची सत्ता आणली. शांत, संयमी नेता हरपला.”
संजयहेमगड्डी, सभागृहनेता, महापालिका
सच्च्या कार्यकर्त्यांना न्याय
सच्चेकार्यकर्ते होते. नेहमी कार्यकर्त्यांना न्याय देत. त्यांच्या पाठीशी राहत. अनेक गरीब कार्यकर्त्यांना त्यांनी महापालिकेत विविध पदे दिली, मोठे केले.”
पद्माकरकाळे, सभापती,स्थायी समिती, महापालिका
सामाजिक भान असलेला नेता
राजकीय घडामोडींवर परिणाम होणार आहे. मुरब्बी व्यक्तिमत्त्व असलेला नेता होता. ते राजकारणात असले तरी सामाजिक भान असलेला लोकनेता हरपला. त्यांच्याकडे संघटन कौशल्य हाेते.” आनंदचंदनशिवे, नगरसेवक
राजकारणातला डाॅक्टर हरपला
माझ्या जीवाचाबंधू समान कार्यकर्ता होता. राजकीय सामाजिक जीवनात संबंध राहिला. राजकारणामुळे रस्ते वेगळे झाले. त्यांचा राजकारणातला चमत्कार होता. शिंदे यांच्या राजकारणात चमत्कार अनेकवेळा घडवला. राजकारणातला डाॅक्टर हरपला.”
मनोहरसपाटे, नगरसेवक
पारख असणारा नेता
कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ काँग्रेस नेता अशी अोळख म्हणजे तात्या. माणसाची पारख त्यांच्यात होती. प्रत्येकाची माहिती त्यांच्याकडे असायची. त्यांच्या जाण्याने काँग्रेससाठी धक्का बसला अाहे. ते राजकारणातले किंगमेकर होते. सामान्य कार्यकर्त्यांना विसरत नसत. सामान्यांचा नेता हरपला.”
महेशगादेकर, माजीशहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
पद्मशालीसमाजाचे नुकसान
नेहमीसमाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या जाण्याने पद्मशाली समाजाचे मोठे नुकसान झाले.” पांडुरंगिदड्डी, प्रभारीविरोधी पक्षनेता, महापालिका
उत्तम संघटन कौशल्य
उत्तमसंघटनकौशल्यआणि राजकारणावर पकड असलेले नेते होते. राजकारणात त्यांनी अनेकांना घडवले. सामान्य कार्यकर्त्याला पदे देऊन न्याय दिला. विकासात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने राजकारणात भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
प्रा.अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष,भाजप
राजकारणाला कलाटणी देणारा
राजकारणात अशक्य असलेल्या गोष्टी शक्य करून दाखवत. राजकारणाला कलाटणी देणारे नेते होते. त्यांचे नेहमी मोलाचे मार्गदर्शन असायचे. महापालिकेत जरी येत नसले तरी त्यांचे वर्चस्व होते.”
सुरेशपाटील, नगरसेवक
दांडगा अनुभव असलेले
राजकीय अनुभव असलेला दांडगा माणूस, कार्यकर्त्यांना घडवणारा नेता हरपला. त्यांच्याकडून राजकीय समीकरण शिकण्यासारखे होते. कार्यकर्त्यांना कसे हाताळायचे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.”
आरिफशेख, माजीमहापौर
कुशल राजकारणी
अनेक वर्षेशहराच्या राजकारणावर अधिसत्ता गाजवणारे व्यक्तिमत्त्व होते. एक कुशल राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे शहराच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे.”
धर्माभोसले, माजीशहराध्यक्ष, काँग्रेस
२०वर्षे महापालिकेवर सत्ता
निवडणुकीत अचूक नियोजन केल्यामुळेच त्यांना यश मिळत होते. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीचे नियोजन तेच करत. सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून त्यांना अनेकांना महापालिकेतील महत्त्वाची पदे दिली. २० वर्षे महापालिकेवर त्यांनी सत्ता गाजवली.”
अॅड.यू. एन. बेरिया, माजीमहापौर
मुत्सद्दी राजकारणी
राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मुत्सद्दी, धुरंधर राजकारणी होते. शून्यातून विश्व निर्माण केले होते. राजकारणाच्या पलीकडे त्यांचे सर्वांशी मैत्रीचे संबंध होते. लोकनेत्याप्रमाणे त्यांनी लोकसंग्रह केला होता.”
प्रा.मोहिनी पतकी, नगरसेविका
त्यांच्या अनुभवाचा फायदा
काँग्रेसपक्षातील ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही काम केले. त्यांच्या अनुभवाचा काँग्रेसला नेहमीच फायदा झाला. त्यांच्या निधनाने आमचा मार्गदर्शक हरपला.”
अलकाराठोड, माजीमहापौर
उभारीदेण्याचे काम केले
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे काम त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून केले. प्रस्थापितांच्या विरोधात त्यांनी काम केले. राजकारणाचा वारसा नसलेल्या कार्यकर्त्यांसाठी काम करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांचा नेता हरपला.”
दिलीपकोल्हे, नगरसेवक
दिग्गज व्यक्तिमत्त्व
सोलापूरच्या राजकारणातीलदिग्गज व्यक्तिमत्त्व होते. समाजातील विविध पक्षांतील व्यक्तींशी त्यांचा चांगला संबंध होता. तात्या कोठे हे एक वादळ होतं. त्यांच्या जाण्याने "तात्या' नावाचं वादळ शांत झालं. त्यांची जागा कोणता नेता घेऊ शकणार नाही.”
पुरुषोत्तमबरडे, िजल्हासमन्वय प्रमुख, शिवसेना
राजकारणातील दीपस्तंभ
Ãतात्यासोलापूरच्याराजकारणातील एक दीपस्तंभ होते. ते जरी काँग्रेसचे नेते असले तरी त्यांचे सर्वच पक्षांच्या नेत्यांशी कार्यकत्यांशी स्नेहपूर्ण संबंध होते. कार्यकर्त्यांना घडवणारा एक वेगळा नेता होता. असा नेता पुन्हा होणे नाही.”
लक्ष्मीकांतठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख,शिवसेना
सर्वांनासामावून घेणारे
सर्व जातीच्या,पक्षांच्या कार्यकर्त्यांना सामावून घेणारे नेते म्हणून ओळख होती. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याशी बोललो होतो. त्यावेळी ते आपल्यातून निघून जातील असे वाटले नव्हते. महेश कोठे शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांना अतीव आनंद झाला होता. कार्यकर्त्यांच्या कठीणप्रसंगी त्यांच्या पाठीशी राहणारा जनसामान्यांचा नेता आज हरपला.”
प्रतापचव्हाण, शहरप्रमुख,शिवसेना
आधारवड होते
Ãकार्यकर्त्यांचेआधारवडहोते. मग तो कार्यकर्ता काँग्रेसचा असो की अन्य कोणत्याही राजकीय पक्षाचा. प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्याबद्दल आत्मीयता होती. कार्यकर्त्यांच्या हृदयात राहणारे नेतृत्व गेल्याने अतीव दु:ख झाले आहे.”
अस्मितागायकवाड, महिलाआघाडीप्रमुख, शिवसेना
सोलापुरात दबदबा
सर् समाजाला सामावून घेणारे व्यक्तिमत्त्व होते. सोलापुरातील राजकारणामध्ये त्यांचा चांगलाच दबदबा होता. रिपाइं काँग्रेसची युती झाल्यानंतर त्यांचा सहवास लाभला होता. राजकारण करताना त्यांनी खासगी जीवनाशी कधीच तडजोड केली नाही. पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
राजाइंगळे, प्रदेशाध्यक्ष,पीपल्स रिपब्लिकन पार्टी (गवई गट)
प्रत्येकास मदत
विविधजाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा नेता होता. ते प्रत्येकांना नेहमी वैयक्तिक पातळीवर सर्वतोपरी मदत करत. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे अनेक व्यक्तींशी ते जोडले होते. कोठे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.”
सुबोधवाघमोडे, प्रदेशाध्यक्ष,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)
पडद्यामागील मुख्य नेता
सोलापूरच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. पडद्यामागील मुख्य नेता हरपला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ताकद मिळाे.”
प्रमोदगायकवाड, अध्यक्ष,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंिडया (पी गट)
प्रेमळ आणि मदतीची भावना
अतिशय प्रेमळ,सर्वांना हवेहवेसे आणि मदतीची भावना असलेले व्यक्तिमत्व. आमचा त्यांच्याशी फडकुले ट्रस्टच्या माध्यमातून खूप जवळून संबंध निर्माण झाले होते. त्यांनी आम्हाला पितृतुल्य या भावनेतून वागविले मार्गदर्शनही केले. त्यांच्या व्यक्तिमत्वाला आपण पारखे झालो आहोत. त्यांना भावपूर्ण आदरांजली.”
बाबूरावमेंदर्गीकर, विश्वस्त,फडकुले विश्वस्त
अजात शत्रू व्यक्तिमत्त्व
सर्वसामान्यांना सहजरीत्या भेटत असत. त्यांचे प्रश्न सोडवत असत. कार्यकर्त्यांची, येथील प्रश्नांची सर्वांगीण माहिती होती. तात्यांची आणि सुशीलकुमार शिंदे यांची गत ४० वर्षांची मैत्री. पुत्र आणि मित्र अशा द्वंद्वातही ते होते. सर्वसामान्यांचा नेता, सर्वपक्षांशी चांगले संबंध होते. एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व.”
दत्तागायकवाड, सामाजिककार्यकर्ते
पक्षातीतनेता
एक पक्षातीत नेता. निष्ठावंत कार्यकर्ता. त्यांच्या अकस्मात निधनाने खूप हानी झाली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.” डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली, कवी
समाजाचीजाण होती
‘पुलोद’च्याकाळातचांगले संबंध होते. मित्र म्हणून खूप चांगला होता. समाजाची जाण होती. राजकारणातील अांतरप्रवाहाची माहिती होती. शिंदे साहेबांची ताकद म्हणून होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकारण २५ वर्षे टिकवले. मुलगा जरी शिवसेनेत गेला असला तरी त्यांचा पिंड मात्र, काँग्रेसचाच होता. प्रस्थापित पुढारी पुत्रप्रेमाचे बळी असतात. तसेते देखील होते.
शंकरपाटील, माजीशहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस