आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक निकामी, ट्रकची बसला धडक; आठ कामगार, 21 प्रवासी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येरमाळा - ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक परिवहन महामंडळाची बस यांच्यात बुधवारी (दि.०१) पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या समोरासमोर धडकेत आठ ऊसतोड कामगार आणि बसमधील २१ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 
 
पोलिसांच्या माहितीनुसार ट्रक (एमएच ०४ ५८६०) येरमाळा मार्गे कर्नाटकातील हल्लेळ येथील कृष्णा शुगर फॅक्टरीकडे जात होता. याचवेळी सांगली आगाराची बस पंढरपूर येथून माजलगांवकडे निघाली होती. घाटात ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने येरमाळ्याजवळ बसला समोरासमोर धडकला. धडक इतकी जोराची होती की बस रोडखाली २०० फूट दूर जाऊन थांबली. अपघातात बसचालक संजय शिवाजी जाधव, वाहक लक्ष्मण बाबाराया तिडके, प्रवासी ज्ञानेश्वर बांगरे (रा. जंजीर गवळा), सुरेश रावसाहेब चौधरी (आथर्डी,ता.कळंब), सुभाष रंगनाथ केदे (रा. केंद्रेवाडी, ता. अंबाजोगाई) उषा भानुदास देशमुख (वरपगाव, ता.केज), विमल प्रभाकर कदम, प्रभाकर देवराज कदम (चनई, जि. बीड), बाळासाहेब दराडे (रा. रुई. ता. धारुर), बाळासाहेब माटे (ननुवाचीवाडी, जि. जालना), सिद्धेश्वर बलभीम जगताप (रा. गुडेगाव, ता. अंबाजोगाई), भगवान आढाव (रा. खरात ताडगाव, ता. माजलगांव), ज्ञानोबा गव्हाणे (रा. बोरगाव, ता. केज), अंगद हरिभाऊ भोतके (रा.रुई, धातुर), नवनाथ शिनगारे (रा. आडगाव, ता. माजलगाव), गोदावरी ज्ञानेश्वर बोचरे (रा. जवळा, ता.माजलगाव), पिंगळाबाई जंगली (रा.जवळा), छत्रभूज जगताप (रा. गोडेगाव. ता. अंबाजोगाई), हनुमंत जगताप, दशरथ शंकर नागरगोजे हे प्रवासी जखमी झाले. 
 
ट्रकमधील धर्मराज मस्के (सावळेश्वर, ता. केज), हनुमंत चाटे (मांडवा, ता. परळी), सुदाम राऊत (वरणगांव, ता. अंबाजोगाई) , केशव रामा साखरे (मांडवा, ता. परळी), शिवाजी ठोंबरे (रा. महिंदवाडी), प्रयागबाई डोईफोडे, गिताबाई यरे (ताडगाव, ) हे ऊसतोड कामगार जखमी झाले. डॉ. शैलेश देवकर यांनी प्रथमोपचार केले. १२ जखमींना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल केले.करण्यात आले. अपघाताची येरमाळा पोलिस ठाण्यात नोंद झाली. 
बातम्या आणखी आहेत...