आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंटेनरने दहा जणांना चिरडले, ५ ठार, ५ जखमी, ढोकी येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तडवळे/ ढोकी - मद्यपान केलेल्या कंटेनर चालकाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या दोन बैलगाड्यांना ठोकरून पुढे गावात तिघांना चिरडल्याची घटना रविवारी (दि.२०) सायंकाळी लातूर-बार्शी मार्गावर ढोकी (ता. उस्मानाबाद) गावाजवळ घडली. या भीषण अपघातात बैलगाडीतील दोघांसह रस्त्यावरील तिघांचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनरसह फरार झालेल्या चालकास ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले व कंटेनर पेटवून दिला. तर चालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर क्र. केए ५२ ए १४९० च्या चालकाने बार्शी येथून लातूरच्या दिशेने जात असताना टी पाँइंटजवळ गावाकडे निघालेल्या शेतकऱ्यांच्या दोन बैलगाड्यांना जोराची धकड दिली व न थांबता भरधावपणे पुढे निघून गेला. यामध्ये एका बैलगाडीतील राजाभाऊ काळे (५०), याकुब पठाण (५० रा. ढोकी) या दोघांसह २ बैल व १ शेळी ठार झाली. तर दुसऱ्या बैलगाडीतील महिपती दुरांडे, स्वाती दुरांडे यांच्यासह महिपती यांचे तीन नातू जखमी झाले. त्यानंतर सदरील कंटेनर तसाच पुढे ढोकी गावामध्ये शिरला.

तेथे पाण्याच्या टाकीजवळ कपडे खरेदीसाठी जात असलेल्या मशीरा खैरतअली सय्यद, मुन्नी समीरखाँ पठाण व उमेर इफ्तेखार पठाण या तिघांना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर उमेर या चिमुकल्याने दवाखान्यात जीव सोडला. यानंतरही कंटेनर पुढे लातूरच्या दिशेने वेगाने निघाला. यावेळी काही ग्रामस्थांनी पाठलाग करूत तो तीन किलोमीटरवर पकडून पेटवून दिला. तर चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.अपघाताची माहिती मिळताच ढोकी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर मानभाव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे संपूर्ण ढोकीवर शोककळा पसरली. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...