आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला न्यायाधीशांवर कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न; न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी स्मिता सचिन माने यांच्यावर एका व्यक्तीने लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोलापूर येथे गुरुवारी घडली. मात्र,वेळीच शिपायाने सतर्कता दाखवत हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.  व्यंकटेश यल्लप्पा बंदगी असे आरोपीचे नाव आहे.   

न्यायाधीश स्मिता माने गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे न्यायदानाचे काम करत होत्या. या वेळी न्यायालयात वकील, क्लार्क होते.  तेवढ्यात बंदगी हा दोन्ही हातात लोखंडी अॅँगल घेऊन न्यायालयात आला. बाहेरून येताना पोलिसांनी त्याला पाहिले नाही. तसेच माने यांच्या कोर्टाच्या दारासमोरही पोलिस कर्मचारी नव्हते. त्यानंतर तो थेट आत आला आणि न्यायाधीशांच्या डायसवरील संगणकावर अॅँगल आदळला. न्यायाधीश घाबरल्या अन् चेंबरमध्ये गेल्या. तेवढ्यात शिपाई विकार शेख याने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...