आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिनी मुंढे घेणार सोलापूरकरांचा निरोप, रणजितकुमार होतील रूजू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री यांची मागणी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी बदली केली तर त्यांच्या ठिकाणी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांची बदली करण्यात आली. रणजितकुमार हे साेमवारी पदभार घेण्याची शक्यता आहे. विद्यमान जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे रविवारी ध्वजवंदन करून पदभार सोपवतील.

रणजितकुमार हे २००८ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. सातारा येथे त्यांनी प्रशिक्षित जिल्हाधिकारी, गोंदिया येथे सहायक जिल्हाधिकारी, नाशिक येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी गडचिरोली जिल्ह्यात कला कौशल्य विकास कार्यक्रमात भरीव योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. रणजितकुमार यांच्या पत्नी संपदा मेहता अहमदनगरच्या जिल्हाधिकारी आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मोठी संधी
सोलापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले. जलयुक्त शिवारमध्ये चांगले काम करता आले. आषाढी यात्रा, नगरपालिकांमधील स्वच्छता अभियान ही कामे समाधानकारक आहेत. शासनाने आता नवी मुंबई आयुक्तपदाची जबाबदारी दिली. याबाबत समाधानी असून दिलेली जबाबदारी योग्यरीतीने पार पाडेन.” तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी