आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाविक तुळजापूरकडे... भाविकांनी फुलला तुळजापूर रस्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गुरुवारी रात्रीपासून भाविकांनी तुळजापूरला पायी चालत जाण्यास सुरुवात केली आहे. नवरात्रीनंतर कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. शुक्रवारी पायी जाणाऱ्यांची गर्दी मोठी होती. तुळजापूरला जाणारे भाविक रूपाभवानी देवीचे दर्शन घेऊन तुळजापूरकडे रवाना होतात. तुळजापूर रस्ता भाविकांनी फुलला आहे. वाटेत चहा, अल्पाेपहार, अारोग्य आदी प्रकारच्या अनेक सेवा विविध संस्था आणि संघटनांकडून विनामूल्य उपलब्ध करून दिल्या अाहेत.
को जागर या संस्कृत शब्दांवरून कोजागरी हा शब्द तयार झाला आहे. कोण जागे आहे असे लक्ष्मी विचारते. कोण आपल्या कर्तव्याला जागे आहे, त्याला लक्ष्मी धन देते. आश्विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. या रात्री इंद्राची पूजा करतात. त्याचप्रमाणे या रात्री चंद्र ९९.९९ टक्के प्रकाशित असतो. त्यामुळे चंद्राचे प्रतिबिंब आपण दुधामध्ये पाहतो. त्या दिवशी मोठ्या प्रमाणात किरणे असतात, अशी आख्यायिका सांगितली जाते.

कोजागरी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी तुळजापूरला जातात. त्यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने सोलापुरात येतात. येथील रूपाभवानी देवीचे दर्शन घेतात.

रूपाभवानी मंदिराची आख्यायिका
२५०वर्षापूर्वी अंबआप्पा मसरे दर महिन्याच्या पौर्णिमेला तुळजापूरला उलटे चालत जात होते. असे खूप दिवस झाल्यानंतर तुळजापूरची देवी प्रसन्न झाली. देवी म्हणाली, ‘आता खूप झाले या पौर्णिमेला तू सरळ सोलापूरला जा.’ सध्या रूपाभवानी मंदिर आहे, त्या ठिकाणी तुळजापूरच्या देवीने दर्शन दिले. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येतात. आधी रूपाभवानी मातेचे दर्शन घेऊनच तुळजापूरला चालत जातात. चालत जाणाऱ्या भाविकांमध्ये तरुणाईही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे.

^लोकांना आपली इच्छा पूर्ण करायची असेल तेव्हा ते देवाकडे येतात. माधुरीघाडगे, विद्यार्थिनी
^देवीवरील श्रद्धेपोटीमी २० वर्षांपासून चालतेय. रुक्मिणीभोसले, वयोवृद्ध महिला
^रोजच्या धावपळीत विसावा म्हणून मी येतोय. महेशपवार, एक विद्यार्थी
बातम्या आणखी आहेत...