आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री तुळजाभवानीचे मंदिर सप्तरंगी प्रकाशाने उजळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - कुलस्वामिनीचे मुख्य प्रवेशद्वार नवरात्रोत्सवापूर्वी सप्तरंगी प्रकाशाने उजळणार आहे. यासाठी अत्याधुनिक पिकसेल- एलइडी दिव्यांच्या माळा महाद्वारवर लावण्यात येत आहेत. पुणे येथील देवीभक्त उंडाळे टोळगे परिवाराच्या वतीने विद्युत रोषणाईचे काम करण्यात येत आहे. दरम्यान, घटनस्थापनेपूर्वी राजेशहाजी महाद्वारावर फटाक्यांची आतषबाजी यंदा करण्यात येणार नाही.
महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी मंदिरातील विद्युतीकरणाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य शिखरासह, भवानी शंकर होमकुंडाच्या शिखरावरील विद्युतीकरणासह मंदिर परिसरातील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रविवारी (दि. २५) राजे शहाजी महाद्वारवरील विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे विद्युतीकरणाच्या कामात अडथळे येत आहेत. तुळजाभवानीच्या मुख्य शिखरासह भवानीशंकर होमकुंडावरील एलइडी बीम, एलइडी वॉश, एलइडी फ्लश लाइट आदींची दुरुस्ती करण्यात आली अाहे. तसेच मंदिर परिसरातील विद्युतीकरणाचीही दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी जवळपास १२ कामगार गेल्या आठ दिवसांपासून काम करत आहेत. सदरील सर्व कामगार कोणताही मोबदला घेता सेवा बजावतात. तर तुळजापूर येथील मंडप कॉन्ट्रॅक्टर सुरेश कावरे वर्षभर मोफत देखभाल दुरुस्तीची सेवा बजावतात.

सप्तरंगीरोषणाईने राजे शहाजी महाद्वार उजळले :मंदिरावर करण्यात येणाऱ्या नयनरम्य विद्युतरोषणाईसाठी एलइडी बल्बचा वापर केला जात आहे. यामध्ये एलइडी नवारपट्या वापरण्यात येत आहेत. एका व्हॅटच्या पिकसेल एलइडी बल्बमधून सप्तरंगाचा प्रकाश बाहेर पडत असल्याने महाद्वार उजळून निघणार आहे. यामध्ये सप्तरंगी प्रकाशाच्या व्हॅटच्या पिकसेल एलइडीच्या १५० माळा, व्हॅटच्या नवार पट्टीच्या १० माळा वापरण्यात आल्या अाहेत. या माळांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या वॉटरप्रुफ, कमी मेन्टेनन्स वीजबचत करणाऱ्या आहेत.

आतषबाजीला मुकणार :दरम्यान, गेल्या वर्षापासून घटस्थापनेपूर्वी राजेशहाजी महाद्वारवर उंडाळे टोळगे परिवाराच्या वतीनेच करण्यात येत असलेल्या नयनरम्य आतषबाजीला यावर्षी हजारो भाविकांसह तुळजापूरकरांना मुकावे लागणार आहे. फायरबॉल, थंडरबॉल, नायग्रा फॉल, शॉवर, हळदी-कुंकू ब्लास्ट, कलर पेपर ब्लास्ट आदी अत्याधुनिक आतषबाजीला मुकावे लागणार आहे.

‘विद्युतरोषणाई कायम स्वरूपी ठेवा’
उंडाळे टोळगे परिवाराच्या वतीने वर्षांपूर्वी तुळजाभवानी मंदिरावर मोफत कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याची देखभाल दुरुस्ती हाच परिवार स्वत: मोफत करतो. सध्या ही विद्युत रोषणाई नवरात्रोत्सवामध्ये दररोज इतरवेळी मंगळवारी शुक्रवारी सुरू करण्यात येते. मंदिराच्या वैभवात भर टाकणारी विद्युत रोषणाई मंदिर संस्थानने दररोज सुरू ठेवण्याची मागणी भाविकांमधून होत आहे.
बातम्या आणखी आहेत...