आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर रस्ता केला चकाचक, सिध्दय्या हिरेमठ यांनी दिली मोफत वाहतूक सेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला तुळजापूरला हजारोंच्या संख्येने भाविक पायी चालत जातात. यावेळी अनेक सेवाभावी संस्था अल्पाहार देण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे येतात. परंतु, यावेळी चहाचे कप, नास्त्याचे प्लेट अादींचे संकलन करण्याची काहीच व्यवस्था नसते. तो कचरा रस्त्याच्या दुतर्फा साचून राहतो आणि परिसराला ओंगळ स्वरूप येते. यावेळीही ते िदसून अाले. हा रस्ता स्वच्छ करण्यासाठी रविवारी सोलापुरातील काही संस्था पुढे अाल्या. त्यांनी मोहीम राबवून स्वच्छता केली. तसेच भाविकाना मोफत वाहतूक सेवा देण्याचे कामही शहरात काही जणांनी केले.
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविक एसटी गाड्यांनी सोलापुरात पोहोचतात. नंतर सिट रिक्षांनी किंवा बसने आपापल्या परिसरात जातात. सिट रिक्षाने दहा ते पंधरा रुपये खर्च येतो तर खासगी रिक्षाने शंभर रुपये खर्च येतो. या भाविकांना समाधानाने घरापर्यंत जाता यावे याकरता सिध्दय्या हिरेमठ यांनी गेल्या वर्षीपासून दोन जीप गाड्या लावून भाविकांना मोफत सोडायचे काम सुरू केले. हिरेमठ हे अडत व्यापारी असून दोन्ही जीप त्यांच्या मालकीचे आहेत.

मारवाडी युवा मंचच्या वतीने रूपा भवानी मंदिर परिसर मुख्य रस्ते पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले. कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन सर्व परिसर झाडू मारून स्वच्छ केला. झाडू मारल्यानंतर सर्व कचरा एका ठिकाणी गोळा करून तो महापालिकेच्या घंटागाडीत टाकला जात होता. रविवारी सकाळी ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मनीष उपाध्ये, उमेश लोया, अतुल सोनी, आशिष उपाध्ये, डागा, कासद करवा आदींनी सहभाग घेतला.
मारवाडी युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी रूपा भवानी येथे स्वच्छता केली.
बातम्या आणखी आहेत...