आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीत तुळशी उद्यान उभारण्याचा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पंढरपुरात होणाऱ्या चार वारी भाविकांची संख्या पाहता तुळशीहारांची मोठी मागणी असते. प्रत्येक यात्रा कालावधीत बाहेरून तुळशीची मागणी करावी लागते. ही गरज लक्षात घेता पंढरपूर शहराजवळच वन विभागाच्या वतीने एकर जागेवर तुळशी उद्यान उभारण्याचा विचार आहे. यासंबंधी वन विभागाला जागा शोधण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली.

आषाढीची तयारी
पंढरपूरशहरातील विकास कामे नियोजन यासंबंधी जिल्हाधिकारी बोलत होते. आषाढी यात्रेस कालावधी खूप कमी असून जी कामे महिनाभरात पूर्ण करता येतील त्यासंबंधीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शौचालयांचे काम प्रगतिपथावर असून हजार शौचालय प्रगतिपथावर आहेत तर हजार पूर्ण झाले आहेत. शहरातील प्रमुख तीन रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना सुविधा मिळाव्यात, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंबंधी सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

वाखरीत जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार
वाखरी पालखी तळावर मुक्कामी असलेल्या पालख्यांना गेल्या अनेक वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा केला जातो, मात्र याठिकाणी नवीन जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याचा विचार आहे. नगरपालिका पाणी टाकी ते वाखरी तळ हे कि.मी.चे अंतर जलवाहिनी टाकल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रश्न येणार नाही. यंदा ही जलवाहिनी पूर्ण झाल्यास पुढील आषाढी यात्रेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.

घाटाच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित
चंद्रभागानदीपात्रावर घाटाचे बांधकाम सुरू आहे, जे घाट आहेत, त्याचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. काही घाटांमध्ये अंतर आहे, ते सलग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. घाटांचे काम अधिक दर्जेदार चांगल्या दर्जाचे कसे होईल? यासंबंधी आढावा घेतला असल्याचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...