आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादकरांची 71 कोटींची दिवाळी; दागिने विक्रीमध्ये घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शहरातील दुचाकी, चारचाकी वाहने, कापड, सौदर्य प्रसाधने विक्रेते, सुवर्णकार आदी व्यवसायिकांनी यावेळी दमदार व्यवसाय करत सुमारे ७१ कोटींची दिवाळी साजरी केली. जीएसटी, अतिवृष्टीचा काहींच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. बसच्या संपामुळे ग्राहक शहरातील दुकानांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे अनेक व्यावसायिकांची ओरड आहे.
 
दुष्काळी परिस्थितीचे चार वर्ष ेसंपल्यानंतर विविध व्यवसायांना पुन्हा बहर चढत आहे. सातत्याने व्यवसायामध्ये वाढ होत आहे. यावर्षीही दिवाळीमध्ये गतवर्षीपेक्षा चांगला व्यवसाय झाल्याचे व्यापारी व्यावसायिकांनी सांगितले. मात्र, जीएसटीच्या जंजाळात अनेक विक्रेते ग्राहकही अडकले आहेत. याचा थोडासा फटकाही व्यवसायाला बसला आहे.
दिवाळीनिमित्त शक्यतो कपड्यांना अधिक मागणी असते. यावेळी दिवाळीला डोळ्यासमोर ठेवून अनेक कपड्यांची दुकाने, व्यावसायिक मैदानात उतरले आहेत. यामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली हेाती. ताग्यातील कपड्यांपेक्षा तयार कपड्यांना मोठी मागणी होती. यासह साडी, किड्स वेअर, महिलांचे अन्य कपडे यांचा एकत्रित व्यवसाय दहा दिवसांमध्ये २१ कोटींपर्यंत गेला. गतवर्षीपेक्षा यावेळी व्यवसायामध्ये वाढ झाली असल्याचे प्रशांत कठारे यांनी सांगितले.
 
इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या बाबतीत मात्र, यावेळी उलट परिस्थिती पाहण्यास मिळाली. गतवर्षीपेक्षा यावेळी एकूण व्यवसायामुळे ३० टक्के घट झाल्याचे जाणवले असल्याचे सुमित बोराना यांनी सांगितले. शहरातील सर्व विक्रेत्यांच्या मिळून सुमारे चार कोटींपर्यंत व्यवसाय झाला. यामध्ये एलएडी टीव्ही, सीडी प्लेअर, मोबाईल, अोव्हन, मिक्सरची अधिक विक्री झाली. फ्रीज, वॉशिंग मशिनला गतवेळीपेक्षा कमी मागणी असल्याचे शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
 
दुचाकींची विक्री स्थिर
वििवध कंपन्यांच्या दुचाकीची विक्री यावर्षीच्या दिवाळीत स्थिर राहिली. गतवर्षीच्या तुलनेत तेवढ्याच दुचाकी विकल्या गेल्या आहेत, अशी माहिती रुपेश मोदानी यांनी सांगितली. यावेळी सर्वप्रकारच्या २१०३ दुचाकींची विक्री झाली. यातून १२ कोटी ६१ लाख रुपयांची उलाढाल झाली. यामध्येही हप्त्याने दुचाकी घेणाऱ्यांची संख्या अधिक होती.
ट्रॅक्टर, चारचाकी वाहनांच्या विक्रीत घट झाली. शहरात १४८ ट्रॅक्टरची विक्री झाल्याचे गणपत गुरव यांनी सांगितले. यातून १२ काेटींची उलाढाल झाली. तसेच २१० चारचाकी वाहनांची विक्री झाली. यामध्ये शक्यतो मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा अधिक समावेश असल्याचे तुषार पाटील यांनी सांगितले. यातून १७ कोटींची उलाढाल झाली.
 

उधारीवर धंदा वाढला
उधारीवर व्यवसाय करणाऱ्याला यावेळी अधिक प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत होते. कापड व्यवसायात अधिक उधारीचे ग्राहक आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्यापही शेताबाहेर आलेले नाही. यामुळे बाजारात चलन नव्हते. तसेच एसटीच्या संपामुळे ग्रामीण ग्राहक बाजारात पोहोचल्यामुळेही फटका बसला.
 
सोने, फटाक्यांवर झाला परिणाम
सोने फटाक्यांवर जीएसटीचा परिणाम दिसून आला. सोने, चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीमध्ये जीएसटीमुळे घट झाल्याचे संजय गणेश यांनी सांगितले. तरीही यातून सुमारे आठ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. फटाक्यांच्या विक्रीतही सुमारे ३० टक्के घट झाली. सुमारे ४० लाखांचे फटाके विक्री झाल्याचे गणेश चौधरी यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...