आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूकप्रकरणी दोघे करमाळ्यामध्ये अटकेत; हवालदारासह बनावट सीएकडून नोकरीचे आमिष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा- रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केलेल्या फरार हवालदारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. दहा ते पंधरा जणांची फसवणूक २०१० मध्ये झाली होती. २३ जुलै २०१६ रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते. त्यांना करमाळा पोलिसांनी पकडले असून, न्यायालयाने सोमवारपर्यत पोलिस कोठडी सुनावली. 


कुर्डुवाडी पोलिस ठाण्यातील हवालदार दिगंबर निवृत्ती मारकड (वय ५४ रा. उमरड ता. करमाळा) बाळासाहेब दिगंबर मारकड (वय २६ रा. मारकडवाडी, ता. माळशिरस) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. जुलै २०१६ मध्ये नागेश दत्तात्रय बरडे (वय २८ रा. ऱावगाव, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली होती.


याबाबत अधिक माहीती अशी
२००७ ते २००९ नागेश बरडे हा पुणे येथे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण घेत होता. या दरम्यान त्याची हवालदार दिगंबर मारकड यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी मारकड यांनी दुसरा आरोपी बाळासाहेब मारकड याची ओळख करून देऊन तो सीए आहे असे सांगून आठलाखांत रेल्वेमध्ये मुलांना नोकरी लावतो, असेही सांगितले. पण त्यावेळी बरडे यांनी एवढे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर साडेचार लाख रुपयांत या दोघांनी नोकरी लावण्याचे कबुल केले. अशा प्रकारे २०१० - २०११ दरम्यान अजून दहा ते पंधरा युवकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळले. 


रक्कम हातात आल्यानंतर मेडिकल करण्याच्या नावाखाली पाटणा येथील हाजीपूर येथे पाठवले. नंतर नोकरीत सामावून घेण्याचे पत्र नंतर मिळेल असे सांगून घरी पाठवले. काही दिवसांनी नागपूर येथे ट्रेनिंगसाठी तीन झायलो कारमध्ये मुलांना पाठवले. पंधरा दिवस लॉजवर ठेवल्यानंतर कसलेही नोकरीचे पत्र देता माघारी पाठवले. अनेक दिवस पैसे देतो म्हणून हेलपाटे मारूनही पैसे दिले नाहीत. त्यामुळे २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता. पहिला आरोपी हवालदार मारकड टेंभुर्णी येथे दुसरा आरोपी पंढरपूर येथे सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गणेशप्रसाद भरते, पोलिस नाईक संजय देवकर, लक्ष्मण कांबळे, राहुल माने यांच्या पथकाने केली. आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सुनावली आहे. 

बातम्या आणखी आहेत...