Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Two Dead in Major Accident at Madha, Solapur District

ट्रकने दुचाकीस्वारांना असे चिरडले, मेंदूचा झाला लगदा.. माढा तालुक्यातील भीषण दुर्घटना

प्रतिनिधी | Update - Oct 11, 2017, 06:25 PM IST

कुर्डूवाडी-टेंभुर्णी मार्गावर कुर्डू गावाजवळ दुचाकीस्वारांना मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात द

 • Two Dead in Major Accident at Madha, Solapur District
  माढा (सोलापूर)- कुर्डूवाडी-टेंभुर्णी मार्गावर कुर्डू गावाजवळ दुचाकीस्वारांना मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. कुर्डू येथील दत्त मंदिराजवळ आज (बुधवारी) दुपारी एक वाजता हा अपघात झाला.

  नवनाथ धोंडीराम गोरे (वय-43, रा.सापटणे भोसे, ता.माढा), सुहास भारत चव्हाण (वय-32, रा.लव्हे, ता.माढा) अशी मृतांची दोघे यात जागीच ठार झाले आहेत. गौतम सर्जेराव राऊत (वय-30, रा.सापटणे भोसे, ता.माढा ) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  मिळालेली माहिती अशी की, भरधाव ट्रकने (एमएच-42-पी- 9636) टेंभुर्णीकडे जाणार्‍या दोन दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार नवनाथ गोरे व सुहास चव्हाण हे दोघे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या मेंदूचा अक्षरश: लगदा झाला. गौतम राऊत हे रस्त्याच्या बाजुला फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले. तिन्ही शेतकरी कुर्डू येथील मधूर दूध प्रकल्पात दुधाचे बिल व उचल घ्यायला निघाले होते, अशी माहिती मिळाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच कुर्डूवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.

  रस्त्यावर सांडला रक्ताचा सडा...
  हा अपघात इतका भीषण आहे की, नवनाथ गोरे व सुहास चव्हाण हे दोघे ट्रकच्या चाकाखाली सापडले. दोघांच्या डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या मेंदूंचा चेंदामेंदा झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा सांडला होता.

  मद्यधुंद ट्रकचालकाला जमावाकडून चोप..
  दरम्यान या अपघातानंतर ट्रकचालकाला कुर्डू येथील गावकर्‍यांनी पकडले. तो दारुच्या नशेत तर्रर्र असल्याचे आढळला. संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण करून कुर्डूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..
 • Two Dead in Major Accident at Madha, Solapur District
  अपघातात मयत झालेले नवनाथ गोरे (सापटणे भोसे ता.माढा)
 • Two Dead in Major Accident at Madha, Solapur District
 • Two Dead in Major Accident at Madha, Solapur District

Trending