आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मलनिस्सारण केंद्रांचे काम पूर्ण, जनरेटरवर झाली चाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरात ड्रेनेज लाइन घालण्यात येत आहे. याशिवाय देगाव, प्रतापनगर, कुमठे येथे मलनिस्सारण केंद्रे उभारण्यात येत आहेत. यासाठी १८७ कोटी रुपये खर्च आहे. यापैकी देगाव आणि प्रतापनगरातील केंद्रांचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. देगाव येथील केंद्रात वीजजोडणी नसली तरी जनरेटरच्या सहाय्याने यशस्वी चाचणी घेण्यात आली. वीज जोडणीचे काम सुरू असून, ते झाल्यावर तेथील केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे.
गावठाण भागातील सांडपाणी देगाव येथील मलनिस्सारण केंद्रात जात असून, तेथे ६० एमएलडीचे केंद्र उभारण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेने एसएमसी कंपनीस मक्ता दिला होता. त्यांच्याकडून काम संथगतीने झाल्याने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी त्या कंपनीचा मक्ता रद्द करून दास कंपनीस दिला. त्यांचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. देगाव केंद्रातील काम पूर्ण झाले असून, तेथे पाणी टाक्यात घेऊन पाणी शुद्ध करण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. तेथे सांडपाण्यावर प्रक्रिया करून नाल्यात सोडण्यात येणार आहे. ते पाणी सीना नदीत जाईल.

मनपा एनटीपीसीमध्ये चर्चा, नियमावली तयार
देगाव मलनिस्सारण केंद्रातील पाणी फताटेवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पास देण्याचे नियोजन आहे. केंद्र सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार शहर परिसरातील ५० किमी परिसरात सांडपाण्याची प्रक्रिया असेल तर ते पाणी स्वत:हून एनटीपीसीने आणावे. त्यानुसार एनटीपीसी ते पाणी घेण्यास तयार असून,त्यासाठी लागणारा खर्च एनटीपीसी करेल. याबाबत महापालिका आणि एनटीपीसी यांच्यात चर्चा सुरू असून, कराराची नियमावली तयार आहे. ते अंतिम टप्प्यात आहे.

दिवाळीनंतर सुरू होईल
^देगावमल निस्सारण केंद्राचे काम पूर्ण झाले असून, वीज जोडणी नाही. आठ दिवसांत वीज मिळेल. त्यानंतर मलनिस्सारण केंद्र सुरू करण्यात येईल. एनटीपीसीबरोबर करार करण्यात येणार आहे.'' मुकुंद भालेराव, मनपा सार्वजनिक आरोग्य अभियंता

एनटीपीसीचे २५० कोटींचे करार
उजनी ते सोलापूर नवीन जलवाहिनी घालण्यासाठी एनटीपीसी महापालिकेला २५० कोटी रुपये देणार आहे. त्यासंदर्भात एनटीपीसीसोबत करार करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम करणार आहे. त्यासाठी प्राधिकरणास टप्प्याटप्प्याने रक्कम देण्यात येईल. यामुळे ७५ एमएलडी पाणी शहरास मिळेल.
बातम्या आणखी आहेत...