आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीची रोषणाई पाहून परतणाऱ्या दोघांना ट्रकने चिरडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिवजयंतीची रोषणाई पाहून मोटरसायकलवर घरी निघालेल्या दोघांना मजरेवाडीजवळ ट्रकने चिरडले. दाेघांच्या मृतदेहाचे तुकडे झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री पावणेएकच्या सुमारास घडली. घटनास्थळी रक्तमांसाचा सडा पडला होता. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला. ट्रकचालकाच्या हयगयीमुळे हा अपघात घडला. याच भागातील काही तरुणांनी ट्रकवर दगडफेक केल्याने तातडीने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला.
महेेश रमेश गिरीगोस्वामी (वय ४२ रा. भारतमाता हौसिंग सोसायटी) गोवर्धन रतन गिरीगोस्वामी (वय ४० रा. बेगमबाजार, हैदराबाद ) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. गोवर्धन हे मूळचे हैदराबादचे असून ते सोलापूरला नातेवाइक महेश गिरीगोस्वामी यांच्याकडे आले होते. ते शहरात शिवजयंतीनिमित्त केलेली रोषणाई पाहून मोटारसायकलवरून (एमएच १३ बीएम ९८५० )घरी परत निघाले होते. मजरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर आले असता ट्रकने (आरजे २१ जीए १४९७ ) जोराने धडक दिली. या धडकेत महेश गोवर्धन ट्रकच्या चाकामध्ये अडकले. या धडकेत एकाच्या पोटावरून एकाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले, तर मोटारसायकल ट्रकच्या खालील बाजूस अडकली.

मोबाइलवरून ओळख...
महेश गोवर्धन या दोघांकडेही मोबाइल होते. अपघातानंतर दोघांचेही चेहरे ओळखण्यायोग्य नव्हते. त्यांच्याजवळील मोबाइलवरून फोन केल्यानंतर महेश भारतमाता हौसिंग सोसायटीतील रहिवासी असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना बोलावून अधिक माहिती पोलिसांनी घेतली.