आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फलटण ते पंढरपूर’ आणि ‘आष्टी-जामखेड-ढवळस’ दोन रेल्वे मार्गाच्या निधीच्या तरतुदीस मंजुरी : जानकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळशिरस - ‘फलटण ते पंढरपूर’ आणि ‘आष्टी-जामखेड-ढवळस’ या राज्यातील दाेन रेल्वे मार्गांच्या निधीच्या तरतुदीस केंद्र शासनाच्या आगामी अर्थसंकल्पात समावेश करण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी दिली.

जानकर यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची रेल्वे भवन येथे भेट घेऊन त्याबाबत चर्चा केली. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील आरपीएफ ट्रेनिंग सेंटरचे स्थलांतर होणार नसल्याची ग्वाहीही रेल्वे मंत्र्यांनी दिल्याचे जानकर यांनी सांगितले.

लोणंद ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे २००८ मध्ये फेर सर्वेक्षण होऊन लोणंद ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतुदीस मंजुरी मिळाली होती. उर्वरित फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी ४०० कोटी खर्च अपेक्षित आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणारा आष्टी-जामखेड-ढवळस (कुर्डुवाडी) या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीची आगामी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे अाश्वासन प्रभू यांनी दिल्याचे जानकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...