Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | two suspects in prostitution are in custody

वेश्या व्यवसायातील दोघा संशयितांना कोठडी, तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती

प्रतिनिधी | Update - Oct 08, 2017, 11:20 AM IST

जुळे सोलापुरातील सावन हाॅटेल, सपना लाॅजमध्ये मुंबई येथून दोघा तरुणींना अाणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याबद्दल हाॅट

 • two suspects in prostitution are in custody
  सोलापूर- जुळे सोलापुरातील सावन हाॅटेल, सपना लाॅजमध्ये मुंबई येथून दोघा तरुणींना अाणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याबद्दल हाॅटेल व्यवस्थापक एजंट यांना अटक झाली होती. शनिवारी त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी माहेश्वरी पटवारी यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवस पोलिस कोठडी देण्यात अाली.
  हाॅटेल मॅनेजर रमेश रामचंद्र बोडगेवार (वय ३६, रा. प्लाॅट नंबर दोन, बिलालनगर, जुळे सोलापूर), एजंट हितेश हस्तीमल अोसवाल (वय ३९, रा. रूम नंबर १०१, स्वराली अपार्टमेंट, सार्थकनगर, वाघोली- हवेली, पुणे) याला पोलिस कोठडी मिळाली अाहे.
  विजापूर नाका पोलिसांना दोघांना अटक करून अाज न्यायालयात हजर केले होते. सरकाततर्फे अल्पना कुलकर्णी अारोपीकडून शशी कुलकर्णी प्रशांत नवगिरे या वकिलांनी काम पाहिले. अोसवाल हा अनेक शहरात हाॅटेल-लाॅजमध्ये एजंटाकडून तरुणी अाणत होता. अनेक शहरात त्याचे जाळे अाहे. ताब्यात घेतलेल्या दोघा तरुणींना तो अाॅक्टोबरला सोलापुरात अाणला होता. पाच तारखेला ही कारवाई झाली. जुळे सोलपुरातील उच्चभ्रू वस्तीत हे हाॅटेल अाहे. शिवाय मुख्य रस्त्यालगतच अाहे. या हाॅटेलात असे प्रकार किती दिवसांपासून सुरू अाहे? अोसवाल हा किती पैसे घेत होता? तरुणींना किती देत होता? ग्राहकाकडून किती पैसे घेत होता? याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.
  जागा मालक, हाॅटेल, चालक अद्याप बेपत्ता
  जागेचा मालक लक्ष्मण गोरखनाथ अाव्हाड (रा. अशोकनगर, िवजापूर रोड, सोलापूर) हाॅटेल- लाॅजचालक सीताराम नारायण महाकांळ (रा. दत्तनगर, मार्कंडेय रुग्णालय शेजारी, सोलापूर) हे दोघेजण अजून बेपत्ताच अाहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली होती. या लाॅजमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली होती.

Trending