आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन रेल्वेगाड्या राजकीय अट्टहासाच्या बळी, धावताहेत रिकाम्या; रोज लाखाचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राजकीय अट्टहासामुळे सोलापूर रेल्वे विभागावरून धावणाऱ्या गुलबर्गा -हैदराबाद इंटरसिटी हुबळी -सिकंदराबाद दोन रेल्वेगाड्यांना पर्यायाने प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आग्रहामुळे फटका बसत आहे. गुलबर्गा - हैदराबाद इंटरसिटी या गाडीसाठी रेल्वेला प्रचंड प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे हुबळी -सिकंदराबाद गाडी होटगीपर्यंत येते. मात्र, सोलापूरला येता परस्पर धावत आहे. 

मागील वर्षी ऑगस्टमध्ये मोठा गाजावाजा करून सुरू झालेली गुलबर्गा -हैदराबाद इंटरसिटी एक्स्प्रेस अाता शेवटच्या घटका मोजत आहे. प्रवाशांच्या मागणीचा विचार यात केलेला नाही. या गाडीमुळे रेल्वेला रोज लाखो रुपयांचा चुना लागत आहे. इंटरसिटीच्या एकूण १४ डब्यातून रोज केवळ सत्तर ते एेंंशीजण प्रवास करतात. उत्पन्न हजारांवर, खर्च लाखांवर ही परिस्थिती आहे. डिसेंबरमध्ये या गाडीतून केवळ १४०० प्रवाशांनी आरक्षित तिकिटावर प्रवास केला. महिन्याकाठी अवघे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आधीच तोट्यात असणाऱ्या भारतीय रेल्वेला लाखोंचा फटका सहन करावा लागत आहे. गाडीची ही परिस्थिती बदलायची असेल तर सोलापूर रेल्वे प्रशासनाने थोडा शहाणपणा दाखवत ती सोलापूरहून सोडावी. यामुळे सोलापूरकरांची सोय होईल, शिवाय तोट्यात असणारी गाडी फायद्यात येईल. 
 
हुबळी - सिकंदराबाद एक्स्प्रेसची तीच गत 
गेल्या चार ते पाच वर्षांपासून सोलापूरकर हुबळी -सिकंदराबाद एक्स्प्रेस होटगीहून सोलापूरला सोडावी ही मागणी करत आहेत. हुबळीहून सिकंदराबादला जाताना ही गाडी पहाटे वाजून २५ मिनिटांनी होटगी स्थानकावर येते. होटगी स्थानकावर इंजिनची दिशा बदलली जाते. ही गाडी सोलापूरला आली तर १५ ते २० मिनिटांचा वेळ लागू शकतो. पण त्या बदल्यात गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभेल. पर्यायाने गाडीचे उत्पन्न वाढेल. पण गाडी सोलापूरला सोडण्यास खर्गे यांचा विरोध असल्याने ही होटगी सोलापूरपर्यंत येत नाही. हा राजकीय अट्टहासाचा दुसरा बळी ठरला. 

माहिती उपलब्ध नाही 
गाडीचे उत्पन्नखर्च याची नेमकी माहिती तूर्त उपलब्ध नाही. सोमवार, मंगळवारपर्यंत माहिती उपलब्ध होईल. तेव्हाच याबाबत अधिक बोलता येईल.” आर.के. शर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक 

हा तर शुद्ध वेडेपणा 
तोट्यात धावणाऱ्या गाड्या तशाच धावू देणे हा शुद्ध वेडेपणा आहे. सोलापूरहून हैदराबादला जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. सोलापूरहून दोन्ही गाड्या सोडल्यास चांगले उत्पन्न मिळेल. प्रवाशांचीही चांगली सोय होईल.” केतनशहा, माजी सदस्य, झोनल रेल्वे सल्लागार समिती 

गाडीची सध्याची वेळ 
गुलबर्गा-हैदराबाद इंटरसिटी ही गाडी दररोज गुलबर्गा स्थानकावरून सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी सुटते. 
दुपारी 2 वाजून ५० मिनिटांनी हैदराबादला पोहचते. 
हैदराबाद स्थानकावरून दुपारी 4 वाजता सुटते. गुलबर्ग्याला रात्री 9 वाजता पाेहचते. 

सोलापूरहून -हैदराबादला जाणाऱ्या गाड्या 
पहाटे 5 वाजून २० मिनिटांनी मुंबई -हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेस, सकाळी 9 वाजून १० मिनिटांनी पुणे -सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस, सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी फलकनामा पॅसेंजर, दुपारी वाजून २५ मिनिटांनी कुर्ला -विशाखापट्टणम आणि रात्री १० वाजून २५ मिनिटांनी मुंबई -हैदराबाद एक्स्प्रेस या केवळ पाच गाड्या सोलापूर स्थानकावरून धावतात. यात शताब्दी एक्स्प्रेस उच्च वर्गातील प्रवाशांसाठी तर फलकनामा पॅसेंजर सर्व सामान्य प्रवाशांसाठी धावते. एक अति वेगवान आहे तर दुसरी अति वेळखाऊ आहे. त्यामुळे यातील तीनच गाड्या सोलापूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. सकाळी इंटरसिटी मिळाली तर त्यास सोलापूरकरांचा प्रतिसाद लाभेल. 

वेळेत बदल आणि सोलापूरहून सोडावी 
गेल्याअनेक वर्षांपासून सोलापूरकरांची सोलापूर -हैदराबाद इंटरसिटी सुरू करण्याची मागणी आहे. गुलबर्गा -हैदराबाद ही गाडी सोलापूरहून सोडली तर सोलापूरकरांची इंटरसिटीची मागणी अापसुकच पूर्ण होईल. सकाळी साडेसातच्या सुमारास सोडली तर या गाडीस मार्ग उपलब्ध होण्यास काही अडचण भासणार नाही. सोलापूरहून साडेसातला सोडली तर ही गाडी हैदराबादला दुपारी दीड ते दोनच्या सुमारास जरी पोहचली तरी प्रवाशांची सोय होईल. एक तास हैदराबाद येथे थांबा घेऊन गाडी दुपारी तीनच्या सुमारास हैदराबादहून निघाली तर सोलापूरला रात्री दहा ते साडेदहा वाजेपर्यंत पोहचू शकते. गाडीची वेळ ठिकाण बदलले तर नक्कीच गाडीला अच्छे दिन येतील. 

प्रवाशांच्या गरजा मागण्यांचा विचार करता ही गाडी सुरू करण्यात आली 
प्रवाशांच्या गरजा मागण्यांचा विचार करता ही गाडी सुरू करण्यात आली. खर्गे यांनी ही गाडी केवळ गुलबर्गावासीयांसाठी असावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. मात्र गुलबर्गावासीयांचा प्रतिसाद नाही. गाडी तोट्यात धावत आहे हे माहीत असूनही सोलापूर रेल्वे प्रशासन या गाडीच्या उत्पन्न खर्चाबाबत काही बोलायला तयार नाही. सोलापूर रेल्वे विभागात रोज सुमारे १८० रेल्वे गाड्या धावतात. त्यापैकी सर्वात बिकट स्थिती या गाडीची आहे. कोणत्याही क्षणी ही गाडी बंद पडू शकते. सोलापूर प्रशासनाने सामंजस्य दाखवून प्रवाशांच्या मागणीचा विचार करून ही गाडी सोलापूर स्थानकावरून सोडली तर कदाचित गाडीचे नशीब बदलेल.