आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी-स्कॉर्पिओचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; एकजण अत्यवस्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सचिन देवकते
सोलापूर - सोरेगावजवळच्याहॉटेलमध्ये जेवण करून सोलापूरकडे येताना नवीन विजापूर नाकाजवळ समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओची दुचाकीला धडक बसली. या विचित्र अपघातात दुचाकीवरच्या तरुणासह पादचारी व्यक्ती अशा दोघांचा मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर अत्यवस्थ अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमाराला घडला.

सचिन दत्तात्रय देवकते (वय ४०, रा. राघवेंद्र नगर, मजरेवाडी) याचा मृत्यू झाला असून याच रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एक़ा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. दुचाकीवरचा सागर शशिकांत विरपे (रा. मजरेवाडी) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर अत्यवस्थ अवस्थेत उपचार सुरू आहेत. नागेश बेणूरकर (रा. राघवेंद्र नगर, मजरेवाडी) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री काही मित्र सोरेगाव भागातील हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेले होते. जेवण करून देवकते विरपे दुचाकीवर येत होते. नवीन विजापूर नाकाजवळ (कुर्ले यांच्या शेताजवळ) समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीच्या प्रखर दिव्यांमुळे गाडीचा अंदाज आल्यामुळे गाडी दुचाकीला धडकली. यानंतर बाजूने पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडकली. या विचित्र अपघातातील तिघांना उपचाराला दाखल केल्यानंतर देवकते अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सीव्हील पोलिस चौकीत या अपघाताची प्राथमिक नोंद आहे. मृत देवकते यांचे होटगी रस्त्यावर झेरॉक्स सेंटर दुकान आहे. आई, वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. पोलिस संशयित वाहनांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी वाहनाचे काही अवशेष सापडले आहेत, असे फौजदार सांगळे यांनी सांगितले.