आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकींची टक्कर; एकाचा मृत्यू, इतर तिघे जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी होऊन मरण पावला तर दोघे जण जखमी अाहेत. हा अपघात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला पर्ल गार्डन ते नवीन डी माॅर्टच्या नजीक घडला. माहीम बाशा शेख (वय २५, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे नाव अाहे. अपघातात अभिषेक संजय रघोजी (वय २२, रा. शेळगी) हा तरुण जखमी असून दुसऱ्या जखमीचे नाव समजू शकलेले नाही.

मृत शेख हे तुळजापूर नाका भागातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला होते. ते मित्र अझरूद्दीन शेख याच्या दुचाकीवरून जात होते. अभिषेक हा महाविद्यालयीन शिक्षण घेत अाहे. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक बसल्यामुळे चौघेजण जखमी झाले. रघोजी याला शासकीय रुग्णालयात उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. माहीम बाशा शेख हे उपचारापूर्वीच मरण पावल्याचे सांगण्यात अाले. जोडभावी पोलिसात या घटनेची नोंद झाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...