आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नणंद-भावजयीच्या गळ्यातील सहा तोळ्यांचे मंगळसूत्र नेले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - जोडभावी पेठेतील प्रियंका चौकातून पायी जाताना दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरांनी हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमाराला घडली. वैशाली मुरली पवार (वय ३८, रा. विद्यानगर, शेळगी) यांनी फिर्याद दिली अाहे. वैशाली या सासू, नणंद, मुलीसह चौकातून पायी जात होत्या. दुचाकीवर अालेल्या तिघा तरुणांनी वैशाली त्यांची नणंद यांच्या गळ्यातून प्रत्येकी तीन तोळ्याचे असे सहा तोळे दागिने हिसकावून नेले. या अाठवडाभरातील ही चौथी घटना अाहे. सुमारे पंधरा तोळे दागिने चोरीस गेले अाहेत.

वडापाव सेंटरजवळ दोन मोबाइल पळवले
डाॅ.अांबेडकर चौकातील एका वडापाव सेंटरजवळ वडापाव घेताना दोघांच्या खिशातील मोबाइल चोरांनी पळविले. ही घटना शनिवारी घडली असून अाज फौजदार चावडी पोलिसात फिर्याद देण्यात अाली अाहे. विकास भोसले गाैस कुरेशी यांचे महागडे मोबाइल चोरीस गेले अाहेत. खिशात ठेवलेले मोबाइल गेले अाहेत. भोसले यांनी तक्रार दिली अाहे.