आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्योहार-मिलन कार्यक्रमाने मानवतेचा झाला मिलाफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिवाळीअसो किंवा रमजान या सणांमध्ये हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन सामाजिक सलोखा जिवंत ठेवतात. हिंदू-मुस्लिम बांधवांनी शिरखुर्मा आणि फराळाचा आस्वाद एकाच वेळी घेतला. त्यामुळे या कार्यक्रमात मानवतेचा मिलाफ झाल्याचे चित्र दिसून आले.

दिवाळीनिमित्त आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने बुधवारी सायंकाळी सहा वाजता मुस्लिम पाच्छा पेठ येथील उद्यानात त्योहार मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपापल्या भावना व्यक्त केले.

याप्रसंगी हाजी ताजोद्दीन मुजाहीद, शिवसेनेचे महेश कोठे, प्रकाश वानकर, राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे, कॉँग्रेसचे चेतन नरोटे, भाजपच्या राेहिणी तडवळकर, कामिनी गांधी, शकील मौलवी, समिउल्लाह, मलंग शेख, प्रा. गुलाम दस्तगीर शेख, डॉ. श्रीकांत येळेगावकर, ज्येष्ठ समाजसेवक ब्रीजमोहन फोफलिया, कय्युम बुऱ्हाण, संयोजक हाजी रियाज खरादी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गायक मोहम्मद अयाज यांनी आपल्या सुमधुर आवाजाने जुनी हिंदी फिल्मी गीते सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. त्यांच्या प्रत्येक गीतावर उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर शिरखुर्मा आणि फराळाचा अास्वाद सर्वांनी घेतला. यामध्ये महिलंाची उपस्थिती लक्षणीय होती.
आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या त्योहार-मिलन कार्यक्रमात गायक मोहम्मद अयाज यांनी हिंदी गीते सादर केली.

^सामाजिक कार्यक्रमांनी सामाजिक एकोपा जिवंत राहतो. रियाज खरादी हे नेहमी असेच चांगले कार्यक्रम घेतात. सर्व तरुणांनी असे कार्यक्रम आयोजित करून सर्वांना सहभागी करून घ्यावे. दिलीपकाेल्हे

^सर्व समाज बांधवांमध्ये धर्मनिरपेक्षता आहे, बंधुभाव आहे. मात्र त्यांना एका छताखाली आणणे गरजेचे होते. दिवाळीच्या सणानिमित्त ते मी साधले. यातून हिंदू-मुस्लिम भाई भाई हा एकच उद्देश होता. तो सार्थक झाला.'' हाजीरियाज खरादी

^निवडणुकीपूरते राजकारण असावे. सामाजिक हित जोपासत मानवता जिवंत ठेवावी. सर्व क्षेत्रातून असे कार्यक्रम आयोजित व्हावेत. विडी घरकुल भागात कार्यक्रम रमजान आणि दिवाळीला दरवर्षी घेतले जातात.'' महेशकोठे
त्योहार-मिलन कार्यक्रमाने मानवतेचा झाला मिलाफ
प्रतिनिधी सोलापूर

दिवाळीअसो किंवा रमजान या सणांमध्ये हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन सामाजिक सलोखा जिवंत ठेवतात. हिंदू-मुस्लिम बांधवांनी शिरखुर्मा आणि फराळाचा आस्वाद एकाच वेळी घेतला. त्यामुळे या कार्यक्रमात मानवतेचा मिलाफ झाल्याचे चित्र दिसून आले.

दिवाळीनिमित्त आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने बुधवारी सायंकाळी सहा वाजता मुस्लिम पाच्छा पेठ येथील उद्यानात त्योहार मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपापल्या भावना व्यक्त केले.

याप्रसंगी हाजी ताजोद्दीन मुजाहीद, शिवसेनेचे महेश कोठे, प्रकाश वानकर, राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे, कॉँग्रेसचे चेतन नरोटे, भाजपच्या राेहिणी तडवळकर, कामिनी गांधी, शकील मौलवी, समिउल्लाह, मलंग शेख, प्रा. गुलाम दस्तगीर शेख, डॉ. श्रीकांत येळेगावकर, ज्येष्ठ समाजसेवक ब्रीजमोहन फोफलिया, कय्युम बुऱ्हाण, संयोजक हाजी रियाज खरादी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गायक मोहम्मद अयाज यांनी आपल्या सुमधुर आवाजाने जुनी हिंदी फिल्मी गीते सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. त्यांच्या प्रत्येक गीतावर उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर शिरखुर्मा आणि फराळाचा अास्वाद सर्वांनी घेतला. यामध्ये महिलंाची उपस्थिती लक्षणीय होती.
आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या त्योहार-मिलन कार्यक्रमात गायक मोहम्मद अयाज यांनी हिंदी गीते सादर केली.

^सामाजिक कार्यक्रमांनी सामाजिक एकोपा जिवंत राहतो. रियाज खरादी हे नेहमी असेच चांगले कार्यक्रम घेतात. सर्व तरुणांनी असे कार्यक्रम आयोजित करून सर्वांना सहभागी करून घ्यावे.
दिलीप काेल्हे

^सर्व समाज बांधवांमध्ये धर्मनिरपेक्षता आहे, बंधुभाव आहे. मात्र त्यांना एका छताखाली आणणे गरजेचे होते. दिवाळीच्या सणानिमित्त ते मी साधले. यातून हिंदू-मुस्लिम भाई भाई हा एकच उद्देश होता. तो सार्थक झाला.''
हाजी रियाज खरादी

^निवडणुकीपूरते राजकारण असावे. सामाजिक हित जोपासत मानवता जिवंत ठेवावी. सर्व क्षेत्रातून असे कार्यक्रम आयोजित व्हावेत. विडी घरकुल भागात कार्यक्रम रमजान आणि दिवाळीला दरवर्षी घेतले जातात.''
महेशकोठे
बातम्या आणखी आहेत...