आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी धरण ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे टेंडर आठ दिवसात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उजनीते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाचे टेंडर अाठ िदवसांत काढण्याचे अादेश विभागीय अायुक्त चोक्कलिंगम यांनी जीवन प्राधिकरणास िदले. एनटीपीसीने सामाजिक दायित्वातून (सीएसअार फंडातून) महापालिकेस २५० कोटी रुपये िदले अाहेत. या निधीतून हे काम हाती घेतले अाहे. परंतु प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून जीवन प्राधिकरणास किती टक्के रक्कम द्यायची यावरून झालेल्या वादावर तोडगा काढण्याचे
सूतोवाच चोक्कलिंगम यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत केले. यावेळी उजनीतून पाणी सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
७५ एमएलडी इतके पाणी वाहून अाणता येईल, अशा क्षमतेची उजनी ते सोलापूर नवीन जलवाहिनी टाकली जाणार अाहे. या कामासाठी जीवन प्राधिकरण विभागाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहण्यासाठी (पीएमसी) यंदा तीन टक्क्यांएेवजी पाच टक्के रक्कम मागितल्याने मनपा जीवन प्राधिकरण यांच्यात विसंवाद होता. महापालिकेने टक्के रक्कम प्राधिकरणाने स्वीकारावी, यासाठी विभागीय आयुक्तांकडे बैठक घेऊन अाग्रह
धरला. अंदाजपत्रकांच्या तीन टक्के रक्कम तूर्त देण्याचे ठरले. पाच टक्के रकमेची आकारणी होत असेल तर वाढीव कोटी एनटीपीसीकडून घेण्याबाबतचा यावेळी निर्णय झाला. चोक्कलिंगम यांनी जीवन प्राधिकरणास दिले. एनटीपीसीने सामाजिक दायित्वातून (सीएसअार फंडातून) महापालिकेस २५० कोटी रुपये दिले अाहेत. या निधीतून हे काम हाती घेतले अाहे. परंतु प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून जीवन प्राधिकरणास किती टक्के रक्कम द्यायची यावरून झालेल्या वादावर तोडगा काढण्याचे सूतोवाच चोक्कलिंगम यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत केले. यावेळी उजनीतून पाणी सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. ७५ एमएलडी इतके पाणी वाहून अाणता येईल, अशा क्षमतेची उजनी ते सोलापूर नवीन जलवाहिनी टाकली जाणार अाहे. या कामासाठी जीवन प्राधिकरण विभागाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहण्यासाठी (पीएमसी) यंदा तीन टक्क्यांएेवजी पाच टक्के रक्कम मागितल्याने मनपा जीवन प्राधिकरण यांच्यात विसंवाद होता. महापालिकेने टक्के रक्कम प्राधिकरणाने स्वीकारावी, यासाठी विभागीय आयुक्तांकडे बैठक घेऊन अाग्रह धरला. अंदाजपत्रकांच्या तीन टक्के रक्कम तूर्त देण्याचे ठरले. पाच टक्के रकमेची आकारणी होत असेल तर वाढीव कोटी एनटीपीसीकडून घेण्याबाबतचा यावेळी निर्णय झाला.

पाणी सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा
उजनीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबत महापालिकेने मागणी केली. महापालिका निवडणूक असल्याने पाणी सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. पण निर्णय झाला नाही. पाणी कमी असल्याने १५ डिसेंबरच्या आत पाणी सोडणे आवश्यक आहे. अन्यथा तीन दिवसांआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
कर्नाटकने उपसा केल्याबाबत चर्चा
शहरासाठी भीमा नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा कर्नाटकमधील दोन बंधाऱ्यांतून उपसा केला जातो, तरीही
एकूण बिल मात्र मनपाला दिले जाते. सदरचे १३ कोटी बिल माफ करावे, अशी मागणी उपमहापौर डोंगरे यांनी
केली. त्यावर चर्चा झाली. जलसंपदा विभागाकडून अहवाल मागवून त्यावर निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली.
बातम्या आणखी आहेत...