आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनी धरण पातळी ‘प्लस’मध्ये, सव्वा लाख क्युसेक विसर्ग सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागीलवर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने धरणामध्ये जेमतेमच पाणीसाठा होता. शासनाने पिण्यासाठी पाणी राखीव ठेवल्याने कॅनालद्वारे शेतीपिकांना पाणी देता आले नाही. गेली सात महिने वजा पातळीमध्ये असलेले उजनी धरण अखेर शनिवारी (दि. ६) प्लसमध्ये आले. शनिवारी रात्री आठ वाजता सिंचन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरणामध्ये ४.१० टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. मागील तीन दिवसांपासून वाढलेल्या विसर्गामुळे शनिवारी सकाळी ११ वाजता उजनी धरण प्लसमध्ये आले. मागील वर्षी ऑगस्ट रोजी धरणामध्ये वजा टक्के पाणीसाठा होता.
उजनी धरणामध्ये गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे झपाट्याने वाढ झाली आहे. लाखाहून अधिक क्युसेकने धरणामध्ये विसर्ग येत असल्याने उजनीची पाणीपातळी वजावरून थेट प्लस वरच आली. शनिवारी रात्री बंडगार्डन २९ हजार तर दौंडचा ९२ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू होता. शनिवारी पुणे जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरी सध्या सुरू असलेला विसर्ग पुढील तीन दिवस कायम राहील. यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये ३० टक्के पर्यंत वाढ होईल, असा विश्वास सिंचन विभागाने व्यक्त केला. सध्याचा पाऊस कायम राहिल्यास येत्या सात, अाठ दिवसात उजनी धरण पूर्णपणे भरू शकते. प्लसमधील साठा ३० टक्के अाला तर धरणातील एकूण साठा जवळपास ९० टक्क्यांवर राहील. त्यामुळे यावेळी समाधानकारक स्थिती दिसून येतेय, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला अाहे.
^उजनी धरणशनिवारी सकाळी ११ वाजता प्लसमध्ये आले असून धरणात जून ते ऑगस्ट या कालावधीत एकूण ३६ टीएमसी पाणी आले. सध्या धरणामध्ये जो विसर्ग येत आहे तो असाच कायम राहिला तर येत्या १० ते १५ दिवसांमध्ये उजनी धरण १०० टक्के भरेल. उजनी धरण भरण्यासाठी लाख क्युसेक्सची गरज आहे. म्हणजेच दररोज लाख क्युसेक्सने विसर्ग येत राहिला तर धरण आठवडाभरात भरेल. शिवाजीचौगुले, अधीक्षक अभियंता उजनी लाभक्षेत्र प्राधिकरण.

तीन दिवसांत ३० टक्के होणार पाणीपातळी...
सध्या उजनी धरणामध्ये सव्वा लाख क्युसेकचा विसर्ग येत आहे. शिवाय पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे ९५ टक्के भरली असल्याने आता सर्व पाणी उजनी धरणामध्ये येणार आहे. हा प्रवाह आणखी पुढील चार दिवस राहण्याची शक्यता असल्याने किमान धरणाची पाणीपातळी ३० टक्के वर जाईल. नारळीपौर्णिमेनंतर पावसाचा जोर वाढल्यास ऑगस्टअखेर पर्यंतच धरण १०० टक्के भरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभागाचे अधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.

दीड महिन्यापूर्वी प्लसमध्ये : गेल्यावर्षी २०१५ मध्ये उजनी धरणातील जलसाठा २२ सप्टेंबर रोजी प्लसमध्ये अाला होता. त्या तुलनेत यावर्षी अाॅगस्ट रोजीच म्हणजे जवळपास दीड महिना अगोदरच उजनी धरणाच्या साठ्याने प्लस (उपयुक्त) पातळी गाठली अाहे. यावर्षी उजनी धणातील पाण्याची पातळी १४ नोव्हेंबर २०१५ रोजीच मृतसाठ्यापर्यंत पोहोचली होती. ती जवळपास सात महिन्यानंतर प्लसमध्ये पोहोचली अाहे.

पुणे - बंगालच्याउपसागराचा वायव्य भाग आणि ओडिशा प. बंगालनजीक असणारे कमी दाबाचे क्षेत्र मध्यप्रदेशजवळ सरकले आहे. मात्र पाकिस्तानचा दक्षिण भाग आणि राजस्थानचा नैऋत्य भाग, येथे कमी दाबाचे क्षेत्र (ट्रफ) नव्याने तयार झाले आहे. गुजरातच्या किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा गोव्याच्या दिशेने सरकला आहे. या स्थितीमुळे कोकण-गोव्यात आणि विशेषत: विदर्भात येत्या २४ ते ४८ तासांत जोरदार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

दरम्यानराज्यात घाटमाथ्यावर तसेच मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत होत आहे. नाशिक परिसरात मात्र पुन्हा जोरदार पावसाला सुरवात झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गोदावरीची पातळी पुन्हा वाढली असून, जायकवाडीचा जलसाठा वाढण्यास मदत मिळणार आहे.

पाऊसनाही, पण उजनीत पाणी : दुष्काळीभागात येणाऱ्या उजनी धरणक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. जूनपासून या परिसरात झालेल्या पावसाने जेमतेम ३०० मिमीची नोंद केली आहे. परंतु पाऊस नसूनही उजनीत प्रचंड पाणी सध्या जमा होत आहे. हे सर्व पाणी पुणे धरणसाखळीतून भीमेच्या पात्रात मिसळत आहे. २४ धरणांपैकी १४ धरणांतून पाण्याचा विसर्ग भीमा नदीत होत असल्याने पावसाचा पत्ता नसून उजनी जिवंत साठ्यात आले आहे.
उजनीतजिवंत साठा प्रारंभ : सोलापूरसाठीमहत्त्वाचे असणारे राज्यातील सर्वाधिक साठवण क्षमता असणाऱ्या उजनी धरणात जिवंत जलसाठा जमा होण्यास आजपासून सुरवात झाली. ऑगस्टपर्यंत उजनीतील साठा मृत पातळीवर होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून भीमा उपखोऱ्यांत, पुणे धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने उजनीमध्ये वेगाने पाणी पोचले आणि मृत साठा पार करून उजनी जिवंत पाणीसाठ्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. भीमा उपखोऱ्यांतील २४ धरणांपैकी १४ धरणांमधून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे.

पुणे धरणसाखळीत २६.१० टीएमसी जलसाठा : गेल्यावर्षी ऑगस्टला पुणे धरणसाखळीत अवघा ४८.७८ टक्के (म्हणजे १४.२२ टीएमसी) पाणीसाठा होता. हेच प्रमाण आज ८९.५४ टक्के (म्हणजे २६.१० टीएमसी) इतके आहे. पुण्याची पाणीकपात कमी करून आता रोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज मंजुरी दिली. यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी बापट यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन केले.
बातम्या आणखी आहेत...