आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीतून पाणी सोडा, अन्यथा घालणार घेराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सोमवारी होणाऱ्या डीपीडीसी बैठकीस घेराव घालणार असल्याचा इशारा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. उजनी धरणातून २८ जानेवारीपर्यंत पाणी सोडल्यास फेब्रुवारी महिन्यात जलसंकट येणार आहे. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी त्वरित निर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीच्या वेळी घेराव घालून आंदोलन करणार असल्याचे चंदनशिवे यांनी सांगितले. पाणी सोडण्याचा निर्णय शासन पातळीवर होताना दिसत नाही. त्यामुळे शहरावरील जलसंकट टाकळयासाठी आपण आंदोलन करत असल्याचे श्री. चंदनशिवे यांनी सांगितले आहे.