आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीचे पाणी शहरासाठी आरक्षित करण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उजनीतील२० टीएमसी पाणी शहरासाठी आरक्षित ठेवावे असे पत्र महापालिकेच्या वतीने शासनाकडे सादर करण्यात आले आहे. उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठी येत असला तरी ५० टक्के धरण भरणे आवश्यक आहे. त्यानंतर शेतीसाठी पाण्याचा विचार होणे आवश्यक आहे. असे पत्रात म्हटले आहे.

या पुढील काळात (पुढील पावसाळ्यापर्यंत) शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यानुसार मनपा तयारी करत आहे. शहर पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात चार पाळीत २० टीएमसी पाणी सोडण्याबाबत मनपा आग्रही आहे. मात्र, नदीच्या पात्रातून पाणी सोडण्यास शासनाचा विरोध आहे. त्यामुळे तूर्त एनटीपीसी जलवाहिनीतून पाणी घेण्याबाबत शासन पातळीवर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे प्रयत्न करीत आहेत.

हिप्परगा तलावात पाणी नसल्याने येथील पाणी उपसा बंद आहे. मागील आठवड्यात तलाव परिसरात पाऊस झाल्याने तलावात सहा फूट पाणीसाठा आहे. एवढ्या जलसाठ्यातून शहरासाठी उपसा करता येत नाही.

औज-३.४० मी. पाणी
शहरालापाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे सोमवारी ३.४० मीटर इतका पाणी साठा औज बंधाऱ्यात होता तर टाकळी पंप हाऊस येथील जॅकवेलजवळ ६.८ फूट पाणी आहे. औज बंधाऱ्यांची क्षमता ४.५ मीटर इतकी आहे. ते पूर्ण होण्यासाठी १.१ मीटर इतकी पातळी कमी आहे.