आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला दहशतवादी संघटना ‘इसिस’चा धोका नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मध्य आशियातील ‘इसिस’चे भूत जगभरात घोंगावत अाहे. नुकताच पॅरिसवर मोठा हल्ला झाला. फ्रान्सने प्रतिहल्ला केला. पण, ‘इसिस’चा धोका भारताला नाही, असा निर्वाळा राज्याचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी रविवारी येथे दिला. अमेरिका, मुंबई, पॅरिसवरील हल्ला सारखाच अाहे. पद्धत अाणि उद्देश वेगळा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एका खासगी कार्यक्रमासाठी रविवारी ते येथे आले होते. सकाळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. दहशतवादी हल्ल्याच्या तंत्राविषयी ते म्हणाले, की एकदम कुठेही हल्ला होत नाही. अगोदर नियोजन करून असे प्रकार होतात. पोलिसांनी तपास करताना काही तारतम्य बाळगावे. काही गोपनीय तांत्रिक माहिती उघड करू नये. कारण त्याचे तपासात अडथळे येतात. एखादा संशयित अारोपी पुढील गुन्हा करताना सावध होतो. तपासात ‘क्लू’ मिळत नाही. एखाद्या चोराला पकडल्यानंतर पोलिस मोठ्या अाविर्भावात माध्यमांना माहिती देतात. तपासातील बारकावे सांगतात. ही बाब टाळावी, असे ते म्हणाले.

पाकिस्तानातील जन सामान्यांना भारताविषयी प्रेम : पाकिस्तानातीलअनुभवाविषयी त्यांनी माहिती दिली. पाकिस्तानात दहशतवाद वाढतोय. हे जरी खरी असले तरी तेथील सर्वसामान्य माणसाला भारताविषयी, ताजमहल, मुंबई, दिल्ली याविषयी अाकर्षण अाहे. त्यांना भारतात यावेसे वाटते. येथे राजकीय सत्ता कुणाची अाहे? त्यांची भूमिका काय अाहे? याच्याशी नागरिकांना काहीही देणे-घेणे नाही.

दहशतवाद्यांचा मूळ उद्देश भीती : दहशतवाद्यांचामूळ उद्देश म्हणजे नागरिकांत घबराट पसरवणे, भीती निर्माण करणे असतो. अापण केलेल्या कृत्याचा प्रसार व्हावा, असा त्यांचा उद्देश असतो.

‘टीअारपी’ची स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये ‘टीअारपी’ची स्पर्धा अाहे. ‘२६-११’चा हल्ला लाइव्ह केल्यामुळे दहशतवादी हॅडलरना काही फायदा झाला. असा हल्ला होऊ शकतो, असे जगाने पाहिले. नेमके अापण काय दाखवावे, काय नाही याबाबत विचार व्हावा. माध्यमांना स्वातंत्र्य अाहे. दुसरी बाजू पाहिली तर टीव्हीमुळे नागरिकांना घटनेचे गांभीर्यही कळले हेही विसरून चालणार नाही. अनेक कामांत माध्यमांचे मोठे योगदान अाहे. पण, पॅरिसमधील मीडियांनी काही तारतम्य बाळगून हल्ल्याची माहिती भडकपणे दाखविली नाही. एखादी घटना घडली, गंभीर गुन्ह्याची सुनावणी चालू असता त्यावर अनुमान काढले जातात. ते नको.

Áदहशतवादी अाधुनिक प्रशिक्षित असतात
Áछोटा राजनचा तपास चांगल्या पद्धतीने
Áखटल्यांचा निपटारा होण्यासाठी जलदगती न्यायालये हवीत
Áशिनाबोरा हत्याकांड प्रकरणाला वारेमाप प्रसिद्धी
Á‘टाडा’,‘पोटा’कायद्याचा वापर चांगल्या पद्धतीने व्हावा
Áअाहेत्या कायद्याची अंमलबजावणी करून चांगला तपास करावा
Á९०दिवसांनंतरहीअारोपपत्र दाखल करण्यास मुभा द्यावी
Áपोलिस वाईट काम करतात, चुकीचे वागतात अशी प्रतिमा चुकीची
Áपोलिस दलातील प्रामाणिक चांगल्या अधिकाऱ्यांमुळे प्रतिमा उंचावते
Áवकिलांनी प्रामाणिक राहून न्याय मिळवून द्यावा, भूलथापा मारू नये.