आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत जोडणींमुळे ड्रेनेज लाइन तुंबल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ड्रेनेजच्या मुख्य लाइनचे काम अपूर्ण असताना अनधिकृत घरगुती जोड दिले जात आहेत. यामुळे मुख्य लाइन तुंबून घाण पाणी रिटर्न येत आहे. घाण पाणी नागरिकांच्या घरासमोर साचत आहे. चिरीमिरी घेऊन दिलेल्या ड्रेनेज जोडणीकडे वरिष्ठ अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत विचारले असता अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.
सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील ड्रेनेज कामाला सुरुवात झाली. शहर आणि हद्दवाढ भागात सर्व ठिकाणी ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू झाले. ड्रेनेज असो किंवा जलवाहिनी असो एकंदरीत खोदाई झाली खड्डे बुजवल्यानंतर माती सपाटीकरण व्यवस्थित होणे बंधनकारक आहे. सपाटीकरण व्यवस्थित झाल्यामुळे जागोजागी खड्डे पडून चिखल झाला आहे. याबाबत संबंधित मक्तेदाराला एका शब्दानेही बोलले जात नाही. वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.

महापालिकेची डोळेझाक
घरासमोर लाइन आणि चेंबर आले की आपण घरजोड कनेक्शन घेऊ शकतो या विचाराने आणि कर्मचाऱ्यांनी दिशाभूल केल्यामुळे नागरिकांनी ड्रेनेज जोडणी करून घेतली. हे काम करण्यासाठी मक्तेदाराकडील काही कर्मचारी आणि महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी नागरिकांकडून चिरीमिरी घेऊन बेकायदा कामे करून दिली. असा प्रकार जुळे सोलापूर, मजरेवाडी, हत्तुरे वस्ती आदी भागात जास्त प्रमाणात दिसून येत आहे.

पत्र दिल्याचे माहीत नाही
^ड्रेनेज काममुख्य कार्यालयामार्फत केले जात आहे. त्यांनी आम्हाला पत्र दिले का नाही याबाबत मला माहिती नाही. याबाबत माहिती घेऊन सांगतो.” नीलकंठ मठपती, झोन अधिकारी

कारवाईसाठी झोनला पत्र
^मुख्यलाइनची पूर्ण जोडणी होण्याअगोदरच नागरिक ड्रेनेज कनेक्शन जोडून घेत आहेत. तसे जोडून घेऊ नये याबाबत वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाहन केले होते. काही उपयोग झाला नाही. झोनला पत्र पाठवून असे प्रकार थांबवण्यास मदत करा आणि कारवाई करा, असे सांगितले आहे.” यू.बी. माशाळे, प्रमुख, ड्रेनेज विभाग
बातम्या आणखी आहेत...