आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू उपसा केल्यास आता स्थानबद्धतेची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नदीपात्रातून अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. राज्य शासनाने वाळू तस्कराच्या मुसक्या आवळण्यासाठी थेट स्थानबद्धतेची कारवाई करा. विनापरवाना वाळू उपसा वा वाहतूक करण्याचे एकपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्यास ही कारवाई करण्याचे आदेशामध्ये नमूद केले. 
भीमा नदीपात्रातून वाळू उपशाबाबत हरित लवादाकडे झालेल्या सुनावणीनंतर राज्य शासनाने कारवाई करण्याचे नव्याने काढलेल्या परिपत्रकामध्ये वरील आदेश दिले आहेत. 

इंडीचे माजी आमदार डॉ. सार्वभौम बगली यांनी भीमा नदीपात्रातून यांत्रिकी बोटीने वाळू उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, यामुळे यांत्रिकी बोटीस परवानगी देऊ नये, नदीपात्रातील होत असलेला वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी राष्ट्रीय हरित लवादाकडे केली होती. यावरून लवादाने विनापरवाना वाळू उपसा रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या? किती कारवाई केली? याचा जाबच लवादाने विचारला होता. यावरून पुन्हा राज्य शासनाने सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना विनापरवाना गौण खनिज उपसा वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी नव्याने परिपत्रकद्वारे कारवाईचे आदेश दिले आहेत. 

राज्य शासनाने जिल्ह्यातील गौण खनिजाचा अवैध उपसा वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा तालुका पातळीवर दक्षता पथकांनी वाळूस्थळांची पाहणी करावी. जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी याचे काटेकोरपणे सनियंत्रण करावे. शिवाय तपासणी पथकांनी केलेल्या तपासणीचा जिल्हाधिकारी यांनी दरमहा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई 
जिल्ह्यात विनापरवाना गाैण खनिज उपसा वा वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी महसूल, पोलिस परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर आहे. विनापरवाना उपसा वाहतूक करणाऱ्यांसोबत महसूल, पोलिस परिवहन विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे संगनमत आढळून आल्यास त्यांच्यावर वैयक्तिक जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी. शिवाय या कर्मचारी, अधिकाऱ्यांची चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करून पुढील कारवाई करावी, असे परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे. 

पाचपटदंड 
विनापरवाना उपसा वा वाहतूक प्रकरणी बाजारमूल्याच्या पाचपट दंड आकारण्याची तरतूद केली आहे. शिवाय वाहतूक उपसा करण्यासाठी असलेली वाहनेही जप्त करावीत. दंडात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दरवर्षी जानेवारी रोजी गौण खनिजाचे बाजारभाव निश्चित करावेत त्यानुसार दंडाची आकारणी करावी. दंडाची आकारणी करताना संबंधितांना नोटीस देऊन त्यांची बाजू ऐकून निर्णय घ्यावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे. 
 
१०० ब्रास वाळूचा साठा आढळल्याचे प्रकरण 
सोलापूर हिळ्ळी(ता. अक्कलकोट) येथील भीमा नदीच्या पात्रातून विनापरवाना वाळू उपसा वाहतूक सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच शुक्रवारी तलाठी मुजावर यांनी पंचनामा करून १०० ब्रास वाळूसाठा केलेला असल्याचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे. मात्र उपसा वा वाहतूक करणारे अद्याप मोकाटच आहेत. याविषयी विचारले असता, त्यांच्यावर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असे, तहसीलदार स्नेहा उबाळे यांनी सांगितले. 

उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. मात्र तलाठी यांनी फक्त पंचनामा केला. अहवालामध्ये कोण उपसा करत आहे, कधीपासून करीत आहे, या बाबी नमूद केल्या नाहीत. प्रत्यक्षात ठिकाणावर मोठ्या प्रमाणात वाळूसाठा असताना फक्त १०० ब्रास वाळूसाठा असल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. 

पोलिस,महसूल वाळू तस्कर यांची साखळीच 
हिळ्ळीयेथील नदीपात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून विनापरवाना वाळूचा उपसा होत आहे. याकडे पोलिस महसूल विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे समोर येते. विशेष म्हणजे नदीपात्रातून रात्री वाळूचा उपसा केला जातो. तर दिवसा वाळूची वाहतूक होत असताना महसूल पोलिस विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. 

शनिवारी पाहणी 
^उपविभागीयअधिकाऱ्यांच्याआदेशानुसार शुक्रवारी तलाठी यांनी हिळ्ळी येथील वाळूसाठ्याचा पंचनामा करून १०० ब्रास वाळूसाठा असल्याचे कळवले आहे. शनिवारी पाहणी करणार आहे. शिवाय संबंधित उपसा करणारे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार आहे.” स्नेहाउबाळे, तहसीलदार, अक्कलकोट 

 
बातम्या आणखी आहेत...