आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदूर येथील शाळकरी विद्यार्थ्याची पूर्ववैमनस्यातून काकाकडून हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवेढा - नंदूर(ता. मंगळवेढा) येथील अमीर अहमद दिलीप मुलाणी (वय १५) या शाळकरी मुलाचे अपहरण करून हत्या केल्या प्रकरणी नजीर नूरमहमद काझी (वय ४२ रा. मंगळवेढा) यास मंगळवेढा पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. शुक्रवारी त्यास मंगळवेढा कोर्टात हजर केले जाणार आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. अटकेतील संशयित आरोपी काझी हा मृत अमीर अहमद मुलाणी याचा काका अाहे.

नंदूर (ता. मंगळवेढा) येथील अमीरअहमद दिलीप मुलाणी हा न्यू इंग्लिश स्कूल (मंगळवेढा) येथून रविवारी शाळा सुटल्यानंतर चोखामेळा चौक येथे जाऊन येतो, असे मित्रांना म्हणाला, पण तो घरी परतलाच नाही. मग वडील दिलीप मौला मुलाणी यांनी सोमवारी मंगळवेढा पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार केली. बुधवारी दुपारी मरवडे रोडवर माळी पेट्रोल पंपापासून सुमारे किलोमीटर अंतरावर कॅनॉलनजीक हत्या करून अमीरचा मृतदेह अाढळल्याची माहिती मजनू गैबी मुलाणी या रिक्षाचालकाने फोनवरून मंगळवेढा पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर घटनेचा तपास करून काझी याला पोलिसांनी अटक केली, असे पोलिस उपाधीक्षक विशाल नेहूल म्हणाले. या प्रकरणी पोलिसांकडून इतर बाबीचाही शोध घेण्यात येत आहे.